शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतल्या हिंसेत शहीद पोलिसाच्या पत्नीला अमित शाहांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 21:39 IST

अमित शाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे.

ठळक मुद्देशाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे. तुमच्या पतीचा अनैसर्गिक झालेल्या मृत्यूवर मला दुःख आहे. त्यासाठी मी सहवेदनाही व्यक्त करतो. 42 वर्षांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल सहाय्यक पोलीस आयुक्त, गोकुलपुरीच्या कार्यालयात कार्यरत होते.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तुमच्या पतीचा अनैसर्गिक झालेल्या मृत्यूवर मला दुःख आहे. त्यासाठी मी सहवेदनाही व्यक्त करतो. 42 वर्षांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल सहाय्यक पोलीस आयुक्त, गोकुलपुरीच्या कार्यालयात कार्यरत होते. केंद्रीय गृहमंत्री पत्रात लिहितात की, तुमचे पती एक आदर्श पोलीस होते. ज्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले होते. खर्‍या सैनिकाप्रमाणे त्यांनीही या देशाच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. तुम्हाला दु:ख आणि अकाली नुकसान सहन करण्याची देवानं शक्ती द्यावी ही प्रार्थना करतो. या दुःखाच्या क्षणी संपूर्ण देश तुमच्या कुटुंबासमवेत आहे. हिंसाचारादरम्यान दगडफेक झाल्यानं पोलीस कर्मचारी जखमी झाला. रतनलाल मूळचा राजस्थानच्या सीकरचा असून 1998मध्ये दिल्ली पोलिसात हवालदार पदावर दाखल झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. तिन्ही मुले आता शिकत आहेत. रतनलालची आई संतरा देवी आणि भाऊ दिनेश गावी कुटुंबासमवेत राहतात. त्याचा एक भाऊ बंगळुरूमध्ये राहतो.नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. हिंसाचारामुळे आतपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 150 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहा