अमित शाहांचं 'ऑपरेशन काश्मीर'! ८ तासांची मॅरेथॉन बैठक, पोलीस प्रमुख अन् डोभालांसोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 02:05 PM2021-10-18T14:05:06+5:302021-10-18T14:06:00+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मॅरेथॉन बैठकीत व्यग्र आहेत. दुपारी दोन वाजल्यापासून ते थेट रात्री १० वाजेपर्यंत अमित शाह सलग विविध बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत.

Home Minister Amit Shah To Hold Meetings Since 2 To 10 Pm On Jammu Kashmir And Other Issues | अमित शाहांचं 'ऑपरेशन काश्मीर'! ८ तासांची मॅरेथॉन बैठक, पोलीस प्रमुख अन् डोभालांसोबत चर्चा

अमित शाहांचं 'ऑपरेशन काश्मीर'! ८ तासांची मॅरेथॉन बैठक, पोलीस प्रमुख अन् डोभालांसोबत चर्चा

Next

नवी दिल्ली-

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मॅरेथॉन बैठकीत व्यग्र आहेत. दुपारी दोन वाजल्यापासून ते थेट रात्री १० वाजेपर्यंत अमित शाह सलग विविध बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत. सर्वात आधी अमित शाह राष्ट्रीय सुरक्षा रणनीती संमेलनात (National Security Strategy Conference) सहभागी होणार आहेत. त्यानंतर देशातील विविध राज्यांच्या डीजीपी आणि आयजींसोबतच गुप्तचर विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत. या निमलष्करी दलाचे प्रमुख देखील उपस्थित असणार आहेत. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील सहभागी होणार आहेत. 

सर्वसामान्य नागरिकांवरील हल्ल्यानं जम्मू-काश्मीर अस्थिर
राष्ट्रीय सुरक्षा रणनीती संमेलन दरवर्षी आयोजित केलं जातं. पण यावेळीचं संमेलन अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ११ नागरिकांची हत्या झाली आहे. तर ९ जवान शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या आजवरची सर्वात मोठी शोधमोहिम सीमा सुरक्षा दलाकडून राबविण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीसोबतच चीन आणि बांगलादेश सीमेबाबतची बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. 

दहशतवाद्यांचा समूळ बिमोड
जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीचा सामना करण्यासाठी स्पेशल ऑपरेशन हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी शाह यांनी एक स्पेशल टीम दिल्लीहून जम्मू-काश्मीरला पाठवली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांकडून दहशतवाद्यांचा ठिकठिकाणी शोध घेऊन खात्मा केला जात आहे. गुप्तचर विभागाकडून मिळणाऱ्या माहितीच्या जोरावर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंगही भेटणार
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज संध्याकाळी अमित शाह यांची भेट घेणार आहेत. भाजपा कॅप्टन अमरिंदर यांच्यासोबत काम करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर सहमती होणं बाकी आहे. आजच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाला हाताळण्याबाबतची चर्चा कॅप्टन अमरिंदर आणि शाह यांच्यात होणार असल्याचं बोललं जात आहे. शेतकरी आंदोलन संपुष्टात आणण्यासाठीच्या विविध पर्यायांचा अभ्यास करुन मोठ्या तयारीतच अमरिंदर सिंग शाह यांची भेट घेणार आहेत. 

Web Title: Home Minister Amit Shah To Hold Meetings Since 2 To 10 Pm On Jammu Kashmir And Other Issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app