रंगांची उधळण करत देशभरात होळीची धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 11:07 IST2025-03-15T10:43:52+5:302025-03-15T11:07:56+5:30

सर्व धर्माचे लोक एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते

Holi was celebrated with enthusiasm across the country on Friday from Kashmir to Kanyakumari | रंगांची उधळण करत देशभरात होळीची धूम

रंगांची उधळण करत देशभरात होळीची धूम

नवी दिल्ली: देशभरात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र शुक्रवारी होळीचा सण उत्साहात साजरा झाला. या रंगोत्सवात लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रमजानच्या पवित्र महिन्यात जुमा नमाजसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती आणि सर्व धर्माचे लोक एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते.

होळीच्या सणानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपती मुर्मू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, 'होळी सणाच्या शुभप्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण एकता, प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देतो. हा सण भारताच्या अमूल्य सांस्कृतिक वारशाचेही प्रतीक आहे. याप्रसंगी आपण सर्व भारतातील मुलांचे आयुष्य आनंदाने भरूया.' 

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी रात्री आक्रा येथे होळीच्या शुभेच्छा देत सोशल मीडिया साइट 'एक्स'वर एक पोस्ट लिहिली आहे. 'तुम्हा सर्वांना होळीच्या अनेक शुभेच्छा. आनंद आणि उत्साहाने भरलेला हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवीन उर्जा देईल आणि देशवासियांच्या एकात्मतेचा रंगही गडद करेल ही माझी इच्छा आहे' असे त्यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपती धनखड़ यांनी एक्स' वर म्हटले आहे की, "होळीच्या शुभप्रसंगी सर्वांना शुभेच्छा. होळी हा वाईटावर चांगल्या गोष्टींनी मिळवलेला विजय आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. हे नवीन दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.

होळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'होळी या उत्साह देणाऱ्या सणासाठी सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. या रंगांच्या उत्सवाने प्रत्येकाच्या जीवनात समृद्धी, प्रगती यावी.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'एक्स'वर लिहिले आहे की, 'होळीच्या पवित्र उत्सवाच्या तुमच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. हा उत्सव, आनंददायक आणि नवीन उर्जेचे प्रतीक असलेला सण आपल्या जीवनात आनंद आणि चांगल्या आरोग्याचे रंग भरेल. आपली होळी आनंददायी आणि सुरक्षित होवो.' गुरुवारी संध्याकाळी लखनौसह काही भागात, जोरदार वारा आणि रिमझिम पावसामुळे होळीच्या रंगात व्यत्यय येण्याची शक्यता होती, परंतु शुक्रवारी सकाळी लोकांना रंगोत्सवाचा आनंद लुटता आला.

नवीन उत्साह मिळावा 

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले, 'तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. रंगांच्या या उत्सवामुळे आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन उत्साह आणि आनंद मिळावा.' काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांनी म्हटले आहे की, 'होळी सण हा विविधतेचा उत्सव आहे. भीती, द्वेष, मत्सर आणि भेदभाव निर्मूलन करणारा आहे. होळी आम्हाला रंगांच्या विविधतेचा आनंद घेण्यासाठी प्रेरित करते. चला, आपण आपल्या बहु-सांस्कृतिक समाजाला रंग, एकता आणि बंधुत्वाने भरूया.' काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी होळींचा अभिवादन संदेश लिहिला, रंग, उमंग, उत्साह, एकता, समानतेचे मिश्रण असलेल्या या महापर्वाच्या शुभेच्छा. आपले कुटुंब, समाज आणि प्रत्येक देशवासीयांसोबत याचा आनंद लुटा.'

चोख सुरक्षा 

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संभल, शाहजहांपूर, मुरादाबाद आर्दीसह काही शहरांत मशिर्दीना ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले होते. उत्तर प्रदेशात शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरा झाला. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

'रंगांचा हा चैतन्यदायी उत्सव प्रत्येकाच्या जीवनात अफाट प्रेम आणि सुसंवाद आणेल. रंगांचा हा सण, आपल्या जीवनात असंख्य आनंद, अफाट प्रेम आणि सुसंवाद आणला. हा उत्सव केवळ रंगांचा नाही तर सत्याच्या विजयाचा आणि परस्पर बंधुत्वाचे एक चैतन्यशील दर्शन घडविणारा आहे-रेखा गुप्ता, मुख्यमंत्री, दिल्ली

आपल्या सर्वांना होळीच्या पवित्र उत्सवाच्या सर्व देशवासियांना मनापासून शुभेच्छा. हा उत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे. तो आपल्याला प्रेम, सुसंवाद साधण्याच्या मार्गाचे अनुसरण करण्याची प्रेरणा देतो. हा उत्सव विविध रंगांनी समृद्धी आणेल अशी प्रभू श्रीरामचरणी अपेक्षा आहे - योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
 

Web Title: Holi was celebrated with enthusiasm across the country on Friday from Kashmir to Kanyakumari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.