Holi 2026: मोफत गॅस सिलिंडर! होळी सणानिमित्त सरकारची सर्वसामन्यांना भेट, कोण घेऊ शकतं लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:16 IST2026-03-02T12:13:27+5:302026-03-02T12:16:20+5:30

Free Gas Cylinders: देशभरात होळीची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असतानाच वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली.

Holi 2026: Delhi and UP Governments Announce Free Gas Cylinders for Poor Families; Check Eligibility and Benefits | Holi 2026: मोफत गॅस सिलिंडर! होळी सणानिमित्त सरकारची सर्वसामन्यांना भेट, कोण घेऊ शकतं लाभ?

Holi 2026: मोफत गॅस सिलिंडर! होळी सणानिमित्त सरकारची सर्वसामन्यांना भेट, कोण घेऊ शकतं लाभ?

देशभरात होळीची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असतानाच वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली. दिल्ली आणि उत्तर प्रदेशसरकारने गरीब व गरजू कुटुंबांसाठी मोफत गॅस सिलिंडर आणि आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात स्वयंपाकघरातील वाढत्या खर्चापासून लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

होळी निमित्त दिल्लीसरकारने  गरीब व गरजू कुटुंबांना थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार थेट सिलिंडर देण्याऐवजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ८५३ रुपये हस्तांतरित करणार आहे. या योजनेसाठी सरकारने साधारण ₹२४२ कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील जवळपास १.७५ कोटी रेशनकार्ड धारक कुटुंबांना याचा फायदा होईल. ज्यांच्याकडे पाईपलाईन गॅस कनेक्शन आहे, अशा कुटुंबांच्याही खात्यात ८५३ रुपये जमा केली जातील. 

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना होळी आणि दिवाळी अशा दोन्ही सणांना मोफत सिलिंडर रिफिल देण्याची घोषणा केली आहे. लाभार्थ्यांना सुरुवातीला सिलिंडर स्वतःच्या पैशाने खरेदी करावा लागेल. त्यानंतर, त्या सिलिंडरची संपूर्ण रक्कम किंवा सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. दरम्यान, करदाते, सरकारी कर्मचारी आणि सेवा निवृ्त्त कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार नाही. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Web Title : होली 2026: मुफ्त गैस सिलेंडर, सरकार का होली का तोहफा!

Web Summary : दिल्ली और उत्तर प्रदेश होली पर मुफ्त गैस सिलेंडर या सब्सिडी दे रहे हैं। दिल्ली खाते में ₹853 जमा करती है; यूपी उज्ज्वला के तहत मुफ्त रिफिल प्रदान करता है। करदाता और सरकारी कर्मचारी बाहर हैं। विवरण के लिए आधिकारिक वेबसाइट देखें।

Web Title : Holi 2026: Free Gas Cylinders as Government's Holi Gift!

Web Summary : Delhi and Uttar Pradesh offer free gas cylinders or subsidies for Holi. Delhi deposits ₹853 into accounts; UP provides free refills under Ujjwala. Taxpayers and government employees are excluded. Check official websites for details.