शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 1:23 AM

१ जानेवारी रोजी नववर्ष दिनी ‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे याची घोषणा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

-विकास झाडेनवी दिल्ली : गेल्या ३२ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी थेट राजपथावरच ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचा संकल्प सोडला आहे. १ जानेवारी रोजी नववर्ष दिनी ‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे याची घोषणा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

सिंघू सीमेवर पंजाबी आणि जाट तर गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलचे शेतकरी, तसेच राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सीमारेषांवर हजारो शेतकरी गेल्या ३२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आम्ही आमचा अधिकार मिळवू, असा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे, परंतु, सरकार आमचे ऐकणारच नसेल, तर येत्या प्रजासत्ताक दिनी कितीही विरोध झाला, तरी राजपथावरून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर धावतील, यासाठी रणनीती तयार केली जात आहे. 

दोन दिवसांपूर्वी शेतकरी नेत्यांनी आवाहन केल्याप्रमाणे हजारो शेतकरी पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तरांचल, उत्तर प्रदेशमधून दिल्लीकडे निघाले आहेत. आतापर्यंत हे आंदोलन शांततेत सुरू आहे. पुढेही उद्रेक होऊ नये, म्हणून नेते काळजी घेत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत रविवारपासून पंजाब व हरयाणामधील टोल नाके वसुलीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० डिसेंबर रोजी कुंडली द्रुतगती महामार्गावर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. नववर्षाच्या स्वागतासाठी दिल्ली व परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांसोबत लंगरमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघू राय असो की, कॅनडाचा गायक जैजी. सामाजिक कार्यकर्ते किंवा वकिलांच्या संघटना, चित्रपटसृष्टीतील कलाकार सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. राजस्थानच्या शिक्षक संघाने आंदोलनाला पाठिंबा  दिला  आहे.

२९ डिसेंबरला शेतकरी सरकारशी चर्चा करणार 

संयुक्त किसान मोर्चाने कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांना २४ डिसेंबरच्या पत्राचे उत्तर पाठविले आहे. संघटनेने सरकार दिशाभूल करीत असल्याकडे लक्ष वेधले. आम्ही प्रत्येक चर्चेत तीनही कायदे मागे घेण्याची मागणी केली. आम्ही २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याबाबत सरकारने उचललेले पाऊल, एमएसपीबाबत कायदेशीर खात्री, एनसीआरमध्ये हवेच्या गुणवत्तेसाठी दंड करण्याच्या कायद्यातून वगळणे व वीज संशोधन विधेयक प्रारूपात बदल या मुद्द्यांवर चर्चा होईल.

पंजाबातून १५ हजार शेतकरी निघाले 

पंजाबच्या संगरूर येथून १५ हजार शेतकरी खनौरी सीमेकडे रवाना झाले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे शेतकरी रविवारी दाबवाली सीमेहून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, सुरक्षा यंत्रणा चोख असल्याने त्यांना सीमेवर अडविले जाईल. शनिवारी गाझीपूर सीमेवर पंजाबातून दोन हजार शेतकरी पोहोचले.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा