PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:05 IST2025-11-25T09:04:38+5:302025-11-25T09:05:59+5:30
Ram Mandir Flag Hoisting Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी मंदिराच्या शिखरावर 'भगवा ध्वज' फडकवण्यात येणार आहे.

PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
रामभक्तांच्या तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर आज (२५ नोव्हेंबर २०२५) एक अत्यंत ऐतिहासिक क्षण अनुभवण्यास मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी मंदिराच्या शिखरावर 'भगवा ध्वज' फडकवण्यात येणार आहे. हा सोहळा कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अयोध्या नगरीत जय्यत तयारी करण्यात आली असून, संपूर्ण देशभरात उत्सवाचे वातावरण आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करतील. रामध्वजा भगव्या रंगाची असून ती ११ फूट रुंद आणि २२ फूट लांब आहे. जमिनीपासून या ध्वजाची एकूण उंची १९१ फूट असेल, ज्यामुळे ती दूरूनही सहज दिसेल. या ध्वजावर भगवान श्री रामांच्या शौर्याचे प्रतीक असलेले तेजस्वी सूर्य, तसेच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह 'ओम' हे अक्षर लिहिलेले आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील अनेक महत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अयोध्या शहरातील अनेक भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. देशाच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने अयोध्या नगरीत दाखल होत असल्याने शहरात मोठा उत्साहाचे वातावरण आहे. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अयोध्या शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.