शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

तिरंग्याचा अपमान, नाही सहन करणार हिंदुस्तान, 'त्या' फोटोवरुन काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 14:48 IST

पंतप्रधान मोदींसह जेपी नड्डा यांनी कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी, त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळून कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याणसिंह यांची अखेरची इच्छा असल्याने त्यांच्या पार्थिवाला हा ध्वज गुंडाळण्यात आला होता.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींसह जेपी नड्डा यांनी कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी, त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळून कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याणसिंह यांची अखेरची इच्छा असल्याने त्यांच्या पार्थिवाला हा ध्वज गुंडाळण्यात आला हो

नवी दिल्ली -  उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. तर, जेपी नड्डा यांनी कल्याणसिंह यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज टाकून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावरुन, आता चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसने नड्डा यांचा फोटो शेअर करत हा तिरंग्याचा अपमान असल्याचे म्हटले आहे.  

पंतप्रधान मोदींसह जेपी नड्डा यांनी कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी, त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळून कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याणसिंह यांची अखेरची इच्छा असल्याने त्यांच्या पार्थिवाला हा ध्वज गुंडाळण्यात आला होता. यावेळी, पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपानेही तो फोटो ट्विट केला आहे. त्यावरुन, युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. युवक काँग्रेसने ट्विट करुन, हा तिरंग्याचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. 'तिरंगे कर अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान।', असे ट्विट युथ काँग्रेसने केले आहे.  युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनीही हा फोटो शेअर केला आहे. तसेच, नव्या इंडियात देशाच्या राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा लावणं योग्य आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यावरुन, आता भाजप नेत्यांवर टीका करण्यात येत आहे.  दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीही भाजपला लक्ष्य केलं आहे. देशापेक्षा पक्ष मोठा आहे, राष्ट्रध्वजावर भाजपच झेंडा. नेहमीप्रमाणं भाजपला ना दु:ख, ना खेद, ना पश्चाताप, असे तिवारी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.  कल्याणसिंह यांनी बोलून दाखवली होती इच्छा

कल्याण सिंह यांनी दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश केल्यानंतर आयोजित एका सभेत बोलताना आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. माझ्या रक्तात संघ आणि भाजपचे संस्कार आहेत. मी आयुष्यभर भाजपात राहावं आणि मृत्यूनंतर माझ्या पार्थिवाला भाजपच्या ध्वजात गुंडाळूनच स्मशानभूमित नेण्यात यावं, असे कल्याणसिंह यांनी म्हटलं होतं. त्यांनी आपली शेवटची इच्छा यावेळी बोलून दाखवली होती. त्यामुळेच, नड्डा यांनी त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळल्याचे दिसून आले. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीIndiaभारतcongressकाँग्रेस