शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

हिंदू धर्म इस्लामपेक्षाही जुना, सध्याचे मुस्लीम आधी हिंदूच होते- गुलाम नबी आझाद (VIDEO)

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:07 PM

एका जाहीर सभेतील आझाद यांच्या 'त्या' विधानाचा व्हिडीओ व्हायरल

Ghulam Nabi Azad, Hindu Muslim Controversy: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) स्थापना केली. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आझाद जम्मू-काश्मीरच्या लोकांना सांगत आहेत की, हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना आहे आणि सर्व मुस्लिम आधी हिंदूच होते. याआधी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या महिला नेता शेहला रशीद यांचे एक वक्तव्य समोर आले होते, ज्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधील विकासासाठी मोदी सरकारचे कौतुक केले होते. तशातच आता आझाद यांच्या व्हिडीओने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला गुलाम नबी आझाद यांचा व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील आहे. आझाद ९ ऑगस्ट रोजी भाषण देण्यासाठी येथे पोहोचले होते. व्हिडिओमध्ये आझाद म्हणतात, 'इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वी झाला होता. भारतात कोणीही बाहेरचा नाही. आपण सर्व या देशाचे आहोत. भारतातील मुस्लिम हे मूळचे हिंदू होते, त्यांचे नंतर धर्मांतर केले. 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये फक्त काश्मिरी पंडित होते. त्यानंतर अनेक लोक धर्मांतर करून मुस्लिम झाले."

यावेळी आझाद यांनी लोकांना बंधुभाव, शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले. "धर्माची राजकारणात सळमिसळ करू नका. धर्माच्या नावावर मतदान करू नका. राजकारणात जो धर्माचा आधार घेतो तो कमकुवत असतो. ज्याची स्वतःवर श्रद्धा आहे, तो धर्माचा आधार घेणार नाही. मी पुढे काय करणार, विकास कसा आणणार हे योग्य व्यक्ती सांगेल. पण जो दुर्बल आहे तो स्वत:च्या धर्माचा आधार घेत मतं मागेल", असे गुलाम नबी आझाद म्हणाले.

आम्ही बाहेरचे नाही, इथलेच आहोत...

"आम्ही बाहेरून आलो नाही. आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. काही बाहेरून आले आहेत, तर काही मूळ इथलेच आहेत, असे भाजपचे काही नेते म्हणाले. मी त्यांना सांगितले की कोणीही इथले किंवा बाहेरून आलेले नाही. आम्ही सारे इथलेच आहोत," असेही आझाद यांनी ठणकावले.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीम