शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

हिंदू रक्षा दलाने स्वीकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 06:23 IST

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी नेत्यांना झालेल्या मारहाणीची जबाबदारी हिंदू रक्षक दलानी उघडपणे स्वीकारली असली तरी पोलिसांनी मात्र त्या विद्यार्थी नेत्यांवरच गुन्हे नोंदविले आहेत.

नवी दिल्ली : गेल्या रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी नेत्यांना झालेल्या मारहाणीची जबाबदारी हिंदू रक्षक दलानी उघडपणे स्वीकारली असली तरी पोलिसांनी मात्र त्या विद्यार्थी नेत्यांवरच गुन्हे नोंदविले आहेत. त्यामुळे जेएनयूसह सर्वच विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार गुन्हेगारांवर कारवाई न करता विद्यार्थी नेत्यांनाच त्रास देत आहे, असा आरोप काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केला आहे.गाझियाबादमध्ये राहणारा हिंदू रक्षा दलाचा प्रमुख पिंकी चौधरी याने आमच्या कार्यकर्त्यांनीच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर हल्ले केले, असा दावा एका व्हिडीओद्वारे केला. जेएनयूमध्ये कम्युनिस्टांचे म्हणजेच देशविरोधी मंडळींचे प्राबल्य आहे. अशा शक्तींना देशात जागा नाही.आम्ही त्यांना तिथे राहू देणार नाही, अशी धमकीही पिंकी चौधरी याने दिली. इतक्या उघडपणे हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या आणि त्याचे समर्थन करणाºया चौधरीला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही वा त्याच्याविरुद्ध गुन्हाही नोंदविला नाही. आम्ही त्या व्हिडीओची चौकशी करीत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.चौधरी याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी जेएनयूमधील जखमी विद्यार्थ्यांवरच गुन्हे नोंदवायला सुरुवात केली. विद्यापीठ छात्र संघाच्या अध्यक्ष आयशे घोष यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठातील शांतता भंग करण्याचा व सर्व्हर रुम फोडल्याचा आरोप त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. या हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळपासून या हल्ल्याची तपासणी सुरू केली. ही तपासणी सुरू असताना पोलिसांनी विद्यार्थी नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.विद्यापीठाच्या आावारातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.चेहरा ओळखणाºया तंत्रज्ञानाचाही वापर पोलिस करीत आहेत. बुरखा घालून हल्लेखोरांचे जे टोळके आले होते, ते कोण आहेत, हे आम्ही शोधू असे पोलिसांनी सांगितले आहे.हल्ल्यातील जखमी प्राध्यापक सुचित्रा सेन यांनीही आज पोलिसांत तक्रार केली आहे. सेन यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. विद्यापीठाच्या बाहेरील युवक विद्यापीठाच्या आवारात काठ्या, सळई आणि अन्य हत्यारे घेऊन आले होते. प्रथम मला एक दगड माझ्या खांद्याला लागला आणि त्यानंतरचा दगड माझ्या डोक्याला लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे सेन म्हणाल्या.>मोदींचे मौन का?एवढी हिंसा होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन का आहे? त्यांची मन की बात कुठे गेली? असा संतप्त सवाल माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी विचारला. मोदींचे मौनच सारे काही बोलत असल्याची टीका त्यांनी केली आहे. हा हल्ला रानटी स्वरूपाचा असल्याची टीका नॉर्थ ईस्ट स्टुडंटस असोसिएशनने केली. या प्रकारातील दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.>कुलगुरूंचे आवाहनविद्यापीठात जे झाले ते विसरून विद्यार्थ्यांनी विद्यापीठात परत यावे, असे आवाहन कुलगुरू एम. जगदेश कुमार यांनी केले आहे. जखमी विद्यार्थ्यांविषयी मला सहानुभूती आहे. असे ते म्हणाले.

टॅग्स :jnu attackजेएनयू