शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे ,कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
4
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
5
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
6
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
7
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
8
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
9
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
10
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
11
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
12
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
13
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
14
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
15
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
16
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
18
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
19
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
20
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस; ऐनवेळी काँग्रेस आमदारांची पलटी, BJP उमेदवाराला केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:01 PM

हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान पार पडले. यात भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले आहेत.

Himachal Rajya Sabha Election Result 2024 : हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान पार पडले. यात भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले आहेत. सत्ताधारी काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. आता भाजपा राज्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. 

हिमाचल प्रदेशातकाँग्रेसच्या 40 जागा आहेत, इतर तीन अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा पक्षाने केला होता. ते तीन आमदार काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र, मतदानावेळी त्यांनीही क्रॉस व्होटिंग केले. काँग्रेसच्या 6 आमदारांसह एकूण 9-10 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, विजयाच्या घोषणेनंतर भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विजयाबद्दल हर्ष महाजन यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानले. 

नेमकं काय झालं?हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 68 आमदारांनी मतदान केले. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना 34-34 मते मिळाली. क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचलमध्ये अडचण निर्माण झाली, यानंतर चिठ्ठी काढून निर्णय घेण्यात आला. यामध्ये भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले तर काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांसह एकूण 9 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करुन भाजपला मतदान केले.

काँग्रेसच्या या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलेहिमाचलमध्ये क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांमध्ये सुजानपूरचे राजेंद्र राणा, धर्मशालाचे सुधीर शर्मा, कुतलाहारचे देवेंद्र भुट्टो, बडसरचे आयडी लखनपाल, लाहौल-स्पितीचे रवी ठाकूर आणि गग्रेटचे चैतन्य शर्मा यांचा समावेश आहे. मतदानापूर्वी हे सर्वजण सकाळी एकाच वाहनातून विधानसभेत पोहोचले आणि मतदानानंतर अचानक अज्ञातस्थळी रवाना झाले.

तीन अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा हिमाचलचे तीन अपक्ष आमदार यापूर्वी काँग्रेसला पाठिंबा देणार होते, पण त्यांनी भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांच्या बाजूने मतदान केले. या अपक्ष आमदारांमध्ये हमीरपूरचे आशिष शर्मा, देहराचे होशियार सिंह आणि नालागढचे केएल ठाकूर यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण