Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:27 IST2025-06-24T15:24:57+5:302025-06-24T15:27:24+5:30
School Teacher Sexually Harassing 24 Girls: २४ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सरकारी शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली.

Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातून संतापजनक प्रकार समोर आला. शाळेतील २४ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी पुढील तपसाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे छळाची तक्रार केली होती. त्यानंतर शाळा प्रशासनाने पोलिसांना कळवले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळा शाळा गाठून शिक्षकाला अटक केली. शाळा प्रशासनाने सांगितले की, शुक्रवारी २४ विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
शिक्षकाने विद्यार्थिनींना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. शाळा प्रशासनाने सांगितले की, तक्रार शाळेच्या लैंगिक छळ विरोधी समितीकडे पाठवण्यात आली. विद्यार्थिनींनी लेखी तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकांनी पीडितांच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले. त्यावेळी बहुतेक पालकांना आपल्या मुलीच्या छळाबद्दल काहीच माहिती नव्हती, असे समजले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ (लैंगिक छळ) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.