हिमाचल प्रदेशमधील इमारतीला भीषण आग, पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 08:39 IST2018-07-23T08:28:31+5:302018-07-23T08:39:41+5:30

इमारतीत काहीजण अडकल्याची भीती

himachal pradesh five killed in fire at residential building in mandi | हिमाचल प्रदेशमधील इमारतीला भीषण आग, पाच जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमधील इमारतीला भीषण आग, पाच जणांचा मृत्यू

मंडी - हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच इमारतीमध्ये काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्याने इमारतीला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. 



 

Web Title: himachal pradesh five killed in fire at residential building in mandi