शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर होणार का ? भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 9:22 AM

दर पाच वर्षांनी सत्तापालट घडवून आणणारे हिमाचल प्रदेशचे मतदार यावेळेसही सत्तापालट घडवून भाजपाच्या पारड्यामध्ये आपल्या मतांचे वजन टाकणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई - दर पाच वर्षांनी सत्तापालट घडवून आणणारे हिमाचल प्रदेशचे मतदार यावेळेसही सत्तापालट घडवून भाजपाच्या पारड्यामध्ये आपल्या मतांचे वजन टाकणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि सध्याचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच भाजपासाठी आहे. या निवडणुकीच्या निकालाचा थेट संबंध केंद्र सरकारच्या कामाशी आणि पाठोपाठ होत असलेल्या गुजरात निवडणुकीशी लावला जाणार असल्यामुळे या दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.

१९६७ पर्यंत या राज्यात केवळ काँग्रेसचीच एकहाती सत्ता होती. १९६६ साली पंजाबमधील काही प्रदेश राज्याला जोडल्यानंतर काँग्रेसला ६० पैकी केवळ ३४ जागा जिंकता आल्या होत्या. पण काँग्रेसला खरा धक्का बसला तो आणीबाणीच्या काळामध्ये. १९८५ पासून राज्यामध्ये जनतेने एकदा काँग्रेस आणि एकदा भाजपा असा आलटून पालटून कौल दिला आहे. अधिक स्पष्ट करायचे झाले तर एकदा वीरभद्र सिंह आणि एकदा प्रेमकुमार धूमल असे म्हणता येईल. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतसिंग परमार यांच्या १८ वर्षांच्या कार्यकाळानंतर वीरभद्र सिंह यांना सर्वाधिक काळ म्हणजे २२ वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले आहे तर भाजपाच्या धूमल यांना १० व त्यापाठोपाठ शांताकुमार यांना ५ वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहता आले.

बेहिशेबी मालमत्तेची प्रकरणे, २०१४ ची मोदी लाट, मतदारांचे पाच वर्षांनी दुस-या पक्षाला निवडणे यासर्व मुद्यांमधून काँग्रेसचे वीरभद्र सिंग पुन्हा यशस्वी होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसने उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे हिमाचलमधील नेते आनंद शर्मा यांच्या प्रचाराच्या सभा आयोजित केल्या तर भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, जगतप्रकाश नड्डा , शांताकुमार, अनुराग ठाकूर अशी फौज प्रचारात उतरवली.

९ तारखेस सर्व ६८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून १८ तारखेस जनतेचा कौल स्पष्ट होईल. हिमाचल प्रदेशचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला मतदारांचे पुरष मतदारांइतकेच जवळजवळ समप्रमाण या राज्याच आहे. काही मतदारसंघात महिलांचे प्रमाण अधिक आहे. चंबा, लाहूल आणि स्पीती, किनौर, कांग्रा, कुलू, शिमला, मंडी, हामिरपूर, उना, सोलन, सिरमौर असे राज्याचे प्रशासकीय विभाग आहेत.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी