गेल्या काही दिवसांपासून विमानसेवेसंदर्भात सातत्याने तक्रारी येत आहेत. आता इंडिगो एअरलाईन्स पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंडिगोच्याविमान ६ ई १०२५ (6 E 1025) मधील जवळपास २०० प्रवाशांनी विमानातच हाय होल्टेज राडा केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यामध्ये संतप्त प्रवासी विमानाच्या एक्झिट गेटजवळ आरडाओरड करताना दिसत आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, चेन्नईहून सिंगापूरसाठी जाणाऱ्या विमानात हा संपूर्ण राडा झाला. संबंधित व्हिडिओ लाईफ कोच जोसेफस नाजारेल अँड्र्यू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ते स्वतः या विमानात उपस्थित होते. त्यांच्या पोस्टनुसार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:२० वाजता सिंगापूरसाठी उड्डाण करणारे विमान तब्बल ५ तास उशिराने, म्हणजेच दुपारी १२ च्या सुमारास झेपावले.
जोसेफस यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे, "यासंदर्भात प्रवाशांना कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना चालू-बंद होणाऱ्या एसीमध्ये विमानातच बसवून ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, या प्रवाशांना बाहेरही जाऊ दिले जात नव्हते. दरम्यान, विमानाचा पायलट कोणतीही माहिती न देता निघून गेला आणि ११.३० च्या सुमारास दुसरा पायलट आला. तोवर प्रवाशांचा संताप अधिकच वाढलेला होता.
जर विमानाला उशीर झाला तर? काय सांगतो नियम? -डीजीसीएच्या नियमांनुसार...- विमानाला २ तासांहून अधिक उशीर होत असेल तर, प्रवाशांसाठी मोफत खाण्यापिण्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. - ६ तासांपेक्षा अधिक उशीर होत असेल तर, पर्यायी विमान अथवा संपूर्ण रिफंड करावे लागते. - तसेच, रात्रभर प्रतीक्षा करावी लागल्यास, हॉटेलची व्यवस्था करणे एअरलाईन्ससाठी बंधनकारक आहे.
Web Summary : Indigo flight 6E1025, bound for Singapore, faced passenger outrage after a five-hour delay. Passengers were stuck inside the plane without information, leading to a high-voltage argument. A pilot was changed amid the chaos. DGCA rules mandate amenities for delayed flights.
Web Summary : सिंगापुर जाने वाली इंडिगो फ्लाइट 6E1025 को पांच घंटे की देरी के बाद यात्रियों के गुस्से का सामना करना पड़ा। यात्रियों को बिना जानकारी के विमान के अंदर ही फंसा दिया गया, जिससे ज़ोरदार बहस हुई। अराजकता के बीच एक पायलट को बदल दिया गया। डीजीसीए के नियमों के अनुसार विलंबित उड़ानों के लिए सुविधाएं अनिवार्य हैं।