शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सचिन पायलट गटाला हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा, २४ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे विधानसभा अध्यक्षांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 15:18 IST

राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांनी पायलट यांच्यासह १९ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये तुमचे सदस्यत्व रद्द का करू नये अशी नोटीस बजावली होती.

जयपूर - राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान जयपूर हायकोर्टाने सचिन पायलट यांच्या गटाला अजून काही काळासाठी दिलासा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या अपात्रतेच्या नोटिशीविरोधात पायलट गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना जयपूर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बंडखोर आमदारांवर २४ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई कऱण्यात येऊ नये, असे आदेश विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांना दिले आहेत. आता या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांनी पायलट यांच्यासह १९ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये तुमचे सदस्यत्व रद्द का करू नये अशी नोटीस बजावली होती. त्यावर उत्तर द्यायला त्यांनी आमदारांना एका दिवसाची संध्याकाळपर्यंतची वेळ दिली होती. त्यानंतर या आमदारांवर लगेच कारवाई करण्याची शक्यता होती. पण या नोटिशीला पायलट व समर्थकांनी न्यायालयात जे आव्हान दिले होते त्यावर  सुनावणी करताना न्यायमूर्तींनी मंगळवार संध्याकाळपर्यंत अध्यक्षांनी या आमदारांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणावर राजस्थान हायकोर्टाने आज निकाल दिला.

काँग्रेसमधील तरुण नेत्यांपैकी एक असलेल्या सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत असलेले मतभेद तीव्र झाल्यानंतर बंडाचा झेंडा फडकवला होता. तसेच राजस्थानमधील गहलोत सरकारने बहुमत गमावले आहे, असा दावा पायलट यांनी केला होता. मात्र अशोक गहलोत यांना आपली राजकीय ताकद पणाला लावत आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता.

दरम्यान, काँग्रेसने सचिन पायलट यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले होते. तसेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरूनही हकालपट्टी केली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :Rajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसPoliticsराजकारण