हेमामालिनी कार अपघातात जखमी
By Admin | Updated: July 3, 2015 09:20 IST2015-07-03T09:20:35+5:302015-07-03T09:20:52+5:30
राजस्थानमधील दौसा येथे कार अपघातात खा. हेमामालिनी जखमी झाल्या असून या अपघातात एका चार वर्षाच्या मुलीचाही मृृत्यू झाला आहे.

हेमामालिनी कार अपघातात जखमी
दौसा : राजस्थानमधील दौसा येथे कार अपघातात खा. हेमामालिनी जखमी झाल्या असून या अपघातात एका चार वर्षाच्या मुलीचाही मृृत्यू झाला आहे. पोलिसांनी हेमामालिनी यांच्या गाडीचा चालक हेमंत ठाकूरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
गुरुवारी रात्री हेमामालिनी आग्रा येथून जयपूरला जात असताना दौसा येथे हेमामालिनी यांच्या मर्सिडीजने अल्टो कारला उडवले. या धडकेत अल्टो कारमधील चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. तर अल्टो कारमधील आणखी चौघे जण या अपघातात जखमी झाले. हेमा मालिनी यांनादेखील दुखापत झाली असून त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हेमामालिनी यांच्या कारचालकाला अटक केली आहे.