हॅलो २- शासकीय संकुलाच्या प्रसाधनगृहास गळती
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30
पेडणे : पेडणे येथील शासकीय कॉम्प्लेक्स उपजिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसाधनगृहास गळती लागल्याने पाणी झिरपत असल्याने भिंतीवर बुरशी निर्माण झाली आहे. सरकारने यावर वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजन साटेलकर यांनी केली आहे.

हॅलो २- शासकीय संकुलाच्या प्रसाधनगृहास गळती
प डणे : पेडणे येथील शासकीय कॉम्प्लेक्स उपजिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसाधनगृहास गळती लागल्याने पाणी झिरपत असल्याने भिंतीवर बुरशी निर्माण झाली आहे. सरकारने यावर वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजन साटेलकर यांनी केली आहे.पेडणे शासकीय इमारतीला ठिकठिकाणी गळती लागल्याने कार्यालयात कामासाठी येणार्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा अभिषेक विनाकारण घ्यावा लागतो. यावर सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाने या इमारतीकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, पेडणे मामलेदार कार्यालयात मामलेदार प्रशिक्षणासाठी अधूनमधून जात असल्याने दैनंदिन कामासाठी येणार्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. (प्रतिनिधी)फोटो ओळी-पेडणे शासकीय इमारतीच्या प्रसाधनगृहाला गळती लागून भिंती खराब झाल्या. (छाया : निवृत्ती शिरोडकर)