शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा, 35 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 11:49 IST

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

नवी दिल्ली - मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (16 एप्रिल) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि  गुजरात या राज्यांमध्ये हवामान विभागाने वादळाचा अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशातली झाबुआ येथे अचानक हवामान बदलल्यानंतर मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत.उदयपूर आणि झालावड येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदयपूरमध्ये विजेचे जवळपास 800 खांब आणि 70 ट्रान्सफॉर्मर कोसळले. अहमदाबाद, राजकोट, महेसाणा, साबरकांठा, आणंद भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे. तसेच मदत जाहीर करण्यात आली आहे. 

पंतप्रधान मोदींच्या ट्वीटवरून कमलनाथांनी सुनावले, पीएमओकडून तासाभरात उत्तर आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या ट्वीटवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कमलनाथ यांनी ट्वीट केल्यानंतर पीएमओकडून तासाभरात उत्तर आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (17 एप्रिल) सकाळी नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं ट्वीट केलं होतं. यामध्ये गुजरातमधील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र मोदींच्या या ट्वीटनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदींवर नुकसान भरपाईवरून भेदभाव करण्याचा आरोप केला आहे. तसेच नुकसान भरपाई ही केवळ गुजरातसाठीच आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. 

'मोदीजी, तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात. मध्य प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तुमची भावनिकता ही केवळ गुजरातपुरतीच मर्यादीत आहे का? तुमच्या पक्षाचे सरकार असले तरी मध्य प्रदेशमध्येही लोक राहतात' असं ट्वीट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे. कमलनाथ यांच्या ट्वीटनंतर तासाभरातच पंतप्रधान कार्यालयाने पुन्हा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि अन्य राज्यातील मुसळधार पावसात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशGujaratगुजरातRajasthanराजस्थानDeathमृत्यूRainपाऊस