पंतप्रधान मोदींच्या ट्वीटवरून कमलनाथांनी सुनावले, पीएमओकडून तासाभरात उत्तर आले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:31 PM2019-04-17T13:31:20+5:302019-04-17T13:52:25+5:30

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (16 एप्रिल) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

narendra modi tweet on death due to rain in gujarat kamal nath criticizes | पंतप्रधान मोदींच्या ट्वीटवरून कमलनाथांनी सुनावले, पीएमओकडून तासाभरात उत्तर आले

पंतप्रधान मोदींच्या ट्वीटवरून कमलनाथांनी सुनावले, पीएमओकडून तासाभरात उत्तर आले

Next
ठळक मुद्देमध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला.मोदींच्या या ट्वीटवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कमलनाथ यांनी ट्वीट केल्यानंतर पीएमओकडून तासाभरात उत्तर आले.

नवी दिल्ली - मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (16 एप्रिल) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या ट्वीटवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कमलनाथ यांनी ट्वीट केल्यानंतर पीएमओकडून तासाभरात उत्तर आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (17 एप्रिल) सकाळी नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं ट्वीट केलं होतं. यामध्ये गुजरातमधील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र मोदींच्या या ट्वीटनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदींवर नुकसान भरपाईवरून भेदभाव करण्याचा आरोप केला आहे. तसेच नुकसान भरपाई ही केवळ गुजरातसाठीच आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. 


'मोदीजी, तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात. मध्य प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तुमची भावनिकता ही केवळ गुजरातपुरतीच मर्यादीत आहे का? तुमच्या पक्षाचे सरकार असले तरी मध्य प्रदेशमध्येही लोक राहतात' असं ट्वीट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे. 


कमलनाथ यांच्या ट्वीटनंतर तासाभरातच पंतप्रधान कार्यालयाने पुन्हा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि अन्य राज्यातील मुसळधार पावसात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि  गुजरात या राज्यांमध्ये हवामान विभागाने वादळाचा अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशातली झाबुआ येथे अचानक हवामान बदलल्यानंतर मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत.उदयपूर आणि झालावड येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदयपूरमध्ये विजेचे जवळपास 800 खांब आणि 70 ट्रान्सफॉर्मर कोसळले. अहमदाबाद, राजकोट, महेसाणा, साबरकांठा, आणंद भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.



 

Web Title: narendra modi tweet on death due to rain in gujarat kamal nath criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.