हृदयद्रावक! आई-वडील, मुलगा मुलगी, एकाच चितेवर चौघांवर अंत्यसंस्कार, त्या अपघातानं संपूर्ण कुटुंबच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 04:15 PM2021-11-25T16:15:10+5:302021-11-25T16:17:19+5:30

Accident News: मध्य प्रदेशमधील सतनाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये संपूर्ण कुटुंबाचाच अंत झाला आहे. एका भरधाव ट्रकने कारला दिलेल्या टक्करीमुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील पती पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

Heartbreaking! Parents, son and daughter, cremation on four on the same cheetah, the whole family died in that accident | हृदयद्रावक! आई-वडील, मुलगा मुलगी, एकाच चितेवर चौघांवर अंत्यसंस्कार, त्या अपघातानं संपूर्ण कुटुंबच संपवलं

हृदयद्रावक! आई-वडील, मुलगा मुलगी, एकाच चितेवर चौघांवर अंत्यसंस्कार, त्या अपघातानं संपूर्ण कुटुंबच संपवलं

Next

भोपाळ - मध्य प्रदेशमधील सतनाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये संपूर्ण कुटुंबाचाच अंत झाला आहे. एका भरधाव ट्रकने कारला दिलेल्या टक्करीमुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील पती पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब जमताल येथीर राहणारे होते. तसेच एका विवाह सोहळ्यामध्ये उपस्थिती लावून हे कुटुंब माघारी परतत होते. त्यादरम्यान रात्री उशिरा हा अपघात झाला. दरम्यान, या संपूर्ण कुटुंबाला एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सतना जिल्ह्यातील मेहरमधील जीतनगरजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने कारला समोरून धडक दिली. ही घडक एवढी जोरात होती की त्यामुळे आई-वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलाचा जबलपूरमधील रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.दरम्यान, पोलिसांना ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

मैहर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जीतनगर गावाजवळ हा अपघात झाला. भरधाव ट्रकने मारुती स्विफ्टला धडक दिली. ही टक्कर होती की त्यामुळे एक मोठा आवाज झाला आणि काही वेळातच सारे काही संपले. या अपघातात जमताल येथील सत्यम उपाध्याय  (४० वर्षे), त्यांची पत्नी मोनिका (३५ वर्षे), मुलगी इशानी ८ वर्षे आणि मुलगा स्नेह (१० वर्षे) यांचा मृत्यू झाला.

मृत सत्यम उपाध्याय यांचे मोबाईल फोनचे दुकान होते. तसेच ते कुटुंबासह एखा विवाह सोहळ्यामध्ये गेले होते. त्यांच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सत्यम यांच्या गावात त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच खळबळ उडाली. दरम्यान, या सर्वांवर एकाच चितेवर ठेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Web Title: Heartbreaking! Parents, son and daughter, cremation on four on the same cheetah, the whole family died in that accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app