Healthcare workers are making excuses to avoid getting coronavirus vaccine | Coronavirus Vaccine न घेण्यासाठी एकापेक्षा एक कारणं देत आहेत लोक, सर्व्हेतून खुलासा....

Coronavirus Vaccine न घेण्यासाठी एकापेक्षा एक कारणं देत आहेत लोक, सर्व्हेतून खुलासा....

देशात कोरोना वॅक्सीनेशनला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्स आणि फ्रन्टलाइन वर्कर्सना वॅक्सीन दिली जात आहे. पण यादरम्यान लोक वॅक्सीन घेण्यास नकार देत आहेत. इतकंच नाही तर वॅक्सीन घ्यावी लागू नये म्हणून एकापेक्षा एक कारणे शोधून काढत आहेत. त्यांची ही कारणे वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, लोकल सर्कलच्या ऑनलाइन सर्व्हेत हा दावा करण्यात आला आहे की, देशाची राजधानी दिल्लीमध्ये ५३ टक्के लोक कोरोना व्हायरस वॅक्सीन घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. तेच  ४४ टक्के लोकांचं मत आहे की, ते त्यांचा नंबर आल्यावर वॅक्सीन घेतील. या सर्व्हेत ७७६२ लोकांनी आपली मते सांगितली. सर्व्हेमध्ये ३ टक्के लोकांचं मत आहे की, ते वॅक्सीन तेव्हाच घेतील जेव्हा वॅक्सीन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होईल.

झी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये एका मेडिकल ऑफिसर स्टाफ नर्सने सांगितले की, त्यांनी केवळ तिच्या दंडावर सुई पकडून ठेवावी जेणेकरून असे दिसावे की, वॅक्सीन घेतली. बंगळुरूमध्ये महानगरपालिकेच्या एका मेडिकल ऑफिसरने सांगितले की, त्यांना साधारण २० असे हेल्थवर्कर्स भेटले, ज्यांनी वॅक्सीन घेतली नाही. पण सर्वांनी वॅक्सीन घेतल्याचं नाटक केलं.

ते हैद्राबादमधील सरकारी हॉस्पिटल आणि प्रायमरी हेल्थ केअर्समध्ये १६ जानेवारीपासून १० ते १५ टक्के स्टाफ कामावरच येत नाहीये. यामागे वॅक्सीनपासून वाचण्याचं कारण सांगितलं जात आहे. दरम्यान काही लोक तर १६ जानेवारीपासून सुट्टीवर गेले आहेत. काही लोकांनी इमरजन्सी असल्याचं सांगत सुट्टी घेतली.

पटणा एम्सचे सीनिअर रेसिडेंट डॉक्टर विनय कुमार यांनी सांगितले की, Covaxin घेण्यासाठी अनेक डॉक्टर तयार नाहीत. त्यासोबतच पीजी स्टुडंट्सही हेच करत आहेत. कारण वॅक्सीनची तिसरी ट्रायल आता सुरू आहे.

मुंबई जेजे हॉस्पिटलमध्ये को-वॅक्सीनचे नोडल अधिकारी डॉक्टर ललित सांखे म्हणाले की, वॅक्सीनबाबत लोकांच्या मनात शंका आहे. अनेक लोकांनी तर वॅक्सीन घेण्यास स्पष्ट नकार दिला. पण यामागे Co-Win अॅपमधील काही समस्या हेही कारण असू शकतं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार, दिल्लीमध्ये आतापर्यंत १२,८५३ हेल्थ केअर वर्कर्सना को-वॅक्सीन दिली गेली आहे. तेच मुंबईत ३,५५३ हेल्थ केअर वर्कर्सना वॅक्सीन दिली गेली. पटणामध्ये ४७,४११ आणि जयपूरमध्ये ३,३७० हेल्थ केअर वर्कर्सना को-वॅक्सीन देण्यात आली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Healthcare workers are making excuses to avoid getting coronavirus vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.