दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:35 IST2025-07-30T08:34:26+5:302025-07-30T08:35:53+5:30
Bike Stunt : ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील अथागड विभागात एका विवाहित जोडप्याचा बाईक स्टंट करतानाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
कुणाला कधी आणि कसली हौस पूर्ण करावी वाटेल काही सांगता येत नाही. मात्र, याच हौसेची त्यांना मोठी किंमत मोजावी लागते. अशीच एक घटना ओडिशामधून समोर आली आहे. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील अथागड विभागात एका विवाहित जोडप्याचा बाईक स्टंट करतानाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कडक कारवाई करत बाईक मालकाला १६,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या जोडप्याचा बाईक स्टंट करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ही संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून बाईक वेगाने चालवत होता. दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते आणि हा स्टंट सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपणे केला जात होता. हा व्हिडीओ इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्ससाठी शूट करण्यात आला आहे.
पोलिसांनी कोणते चलान कापले?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, एका जागरूक नागरिकाने या संबंधी माहिती ट्विटरवर शेअर केली. ओडिशा वाहतूक विभाग, डीजीपी, कटकचे जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव उषा पाधी यांना टॅग केले. तक्रारीत व्हिडीओसोबत बाईकचा नोंदणी क्रमांक देखील जोडण्यात आला होता, ज्यामुळे बाईक मालकाची ओळख पटवणे सोपे झाले. तपासादरम्यान, असे आढळून आले की बाईक मोहन साहू यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. आरटीओने मोटार वाहन कायद्याच्या विविध तरतुदींनुसार ₹ १६,००० चा चलन जारी केला.
कलम १८४: धोकादायक गाडी चालवणे: ₹५,०००
कलम १९०(२) – हवा आणि ध्वनी प्रदूषण निर्माण केल्याबद्दल १०,००० रुपये दंड
कलम १९४(ड) – हेल्मेट न घालणाऱ्या चालक आणि प्रवाशाला १,००० रुपये दंड
वाहतूक विभागाची कडक कारवाई
सार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी करणे हा एक गंभीर गुन्हा आहे, जो केवळ स्वतःच्या जीवालाच नव्हे तर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, परिवहन विभाग राज्यातील सर्व जिल्ह्यांवर कडक नजर ठेवून आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल. या घटनेने स्पष्ट संदेश दिला आहे की सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजसाठी नियमांचे उल्लंघन केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.