पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:43 IST2025-06-21T15:40:52+5:302025-06-21T15:43:09+5:30

Crime News: पतीने त्याच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह थेट घरासमोर पुरला. त्यानंतर दोन महिन्यापर्यंत तो त्याची पत्नी घर सोडून निघून गेली, असे नातेवाईकांना सांगत राहिला. दरम्यान, या महिलेच्या वडिलांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर...

He killed his wife and buried her body outside the house, fooled the police and relatives, and tried to tell them for two months... | पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराबाहेर पुरून नंतर पोलीस आणि नातेवाईकांची सुमारे दोन महिने दिशाभूल केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील फरिदाबाद येथे घडली आहे. येथे एका पतीने त्याच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह थेट घरासमोर पुरला. त्यानंतर दोन महिन्यापर्यंत तो त्याची पत्नी घर सोडून निघून गेली, असे नातेवाईकांना सांगत राहिला. दरम्यान, या महिलेच्या वडिलांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तसेच मुलीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी घराबाहेर खोदकाम करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता घरासमोर या महिलेचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह सापडला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत महिलेचं नाव तनू असं असून, तिच्या पतीनेच पतीने तिची हत्या केल्याचे आणि कुणाला शंका येऊ नये यासाठी नियोजनबद्धरीत्या तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासामधून समोर आले आहे. त्यानंतर तो पत्नीला पुरलेल्या ठिकाणाहून नियमितपणे ये जा करायचा. तसेच काही झालंच नसल्याचा आव आणून सासरच्या लोकांची आणि पोलिसांची दिशाभूल करायचा. तसेच त्याची पत्नी काही कारणाने नाराज होऊन कुठेतरी निघून गेली, असं सांगायचा.

मात्र, काही दिवसांनंतर तनूच्या वडिलांना जावयाच्या बोलण्यावर संशय आला. त्यांनी सातत्याने शोध घेऊनही मुलीचा काहीच पत्ता लागत नसल्याचे दिसून आल्यावर त्यांना जावयावर असलेला संशय अधिकच गडद झाला. त्यानंतर जावयाच्या घराबाहेर असलेल्या मातीच्या संशयास्पद ढिगाबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी खोदकाम केले असता तिथे तनू हिचा सडलेल्या स्थितीतील मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

Web Title: He killed his wife and buried her body outside the house, fooled the police and relatives, and tried to tell them for two months...