पत्नीला घेऊन जाण्यासाठी तो सासुरवाडीत आला. पण, तिने सोबत यायला नकार दिला. त्यामुळे तो रागावला आणि थेट उड्डाणपूलच गाठला. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक व्यक्ती उड्डाणपूलावरून आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पूलाच्या कठड्यावर बसली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील घटना आहे उत्तर प्रदेशातील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आलेल्या व्यक्ती फरुखाबादचा रहिवासी आहे. तो ताजगंज येथील रामनगरमध्ये आला होता. पत्नीला परत घरी घेऊन जाण्यासाठी आला, पण पत्नीचं आणि त्याचं भांडण झालं.
पत्नीने त्याला सोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला राग आला आणि जीव संपवण्याचा विचाराने तो उड्डाण पूलावर गेला. कठड्यावर गेल्यानंतर लोकांचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि गोंधळ उडाला. रिंग रोड उड्डाणपूलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलीस पोहोचले आणि त्याला वाचवले.
व्हिडीओमध्ये पोलीस सावधपणे त्याच्या मागून येतो आणि त्याला धरून मागे खेचत असल्याचे दिसत आहे. तो व्यक्ती उड्डाणपूलावर चढल्यानंतर खाली जमलेल्या गर्दीतील कुणीतरी पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे पोलीस वेळीच तिथे पोहोचू शकले आणि त्याचा जीव वाचला.