वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 06:14 IST2025-08-27T06:10:03+5:302025-08-27T06:14:19+5:30
Mohan Bhagwat News: भारताची विविधता हीच त्याच्या एकतेचा मुख्य स्रोत आहे आणि वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी सांगितले.

वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
नवी दिल्ली - भारताची विविधता हीच त्याच्या एकतेचा मुख्य स्रोत आहे आणि वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी सांगितले.
अखंड भारतात प्राचीन काळापासून राहणाऱ्या लोकांमध्ये पूर्वजांच्या परंपरा समान असून, या भूभागात ४० हजार वर्षांहून अधिक काळापासून राहणाऱ्यांचे ‘डीएनए’ही समान आहेत असेही ते म्हणाले ‘रा. स्व. संघाची १०० वर्षांची वाटचाल : नवे क्षितिज’ या विषयावर दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी त्यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधला.
प्राचीन काळापासून भारतीयांनी माणसामाणसात भेद केला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.