शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Hathras Case : प्रकाश आंबेडकरांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट; म्हणाले - सीबीआय तपासावर विश्वास नाही

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 11, 2020 21:13 IST

पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचे दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा येथील पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. (Prakash Ambedkar)

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे.

हाथरस - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी, हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचे दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा येथील पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयीन तपासाचे आदेश आल्यास त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड लावायला हवा. यामुळे पुरावे काढणे सोपे होईल. 

सीबीआय तपासावर प्रश्न -सीबीआय तपासासंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले, येथील अधिकारीच सीबीआयमध्ये जातात. स्थानिक अधिकाऱ्यांशीही त्यांचे संबंध असतात. अशात सीबीआयवर विश्वास नाही. जर सीबीआय अथवा एसआयटीने तपास केला, तर सर्व दस्तऐवज न्यायालयाच्या देखरेखीत असायला हवेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होऊ नये. रात्रीतूनच मृतदेह जाळला, तर कुणावर विश्वास ठेवावा?  येथील प्रशासनाने धमकावण्याचे काम केले आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

एक ट्विट करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''आज हाथरसच्या आमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो होतो. योगी सरकारने आज सकाळी यांना लखनौ येथे नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कुणीही नेण्यासाठी आलेले नाही. सरकारने अधिक संवेदनशील होणे आवश्यक आहे. आम्ही आणि देशातील कोट्यवधी आंबेडकरवादी आपल्या या कुटुंबासोबत आहोत. हाच विश्वास देऊन जात आहे.''

''हे स्पष्ट आहे, की स्थानिक शासन-प्रशासनाने आपली विश्वसनीयता पूर्णपणे गमावली आहे. यामुळेच कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त अथवा सिटिंग न्यायाधिशांकडून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. जी अगदी उचित आहे. कुटुंबाच्यावतीने आपल्या सर्व पक्षांना ही मागणी करावी लागेल,'' असेही आंबेडकरांनी म्हटले आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग