शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

हाथरस : भाजपला जदयुकडून घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 2:10 AM

राजकारणही तापले : जदयुचे के.सी. त्यागी म्हणाले, पंतप्रधानांचा हस्तक्षेप योगी सरकारसाठी लाजिरवाणा

ठळक मुद्दे जदयुचे नेते त्यागी म्हणाले की, हाथरस प्रकरणातील मुलीला गंभीर परिस्थितीनंतरही एम्समध्ये दाखल करण्यात आले नाही.

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीची लगबग सुरू असताना दलित तरुणीच्या मृत्यूप्रकरणावरून भाजपचा सहकारी पक्ष जदयुनेच आता योगी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांचा हस्तक्षेप हा योगी सरकारसाठी लाजिरवाणा असल्याची टीका जदयुचे महासचिव के. सी. त्यागी यांनी केली आहे.

त्यागी म्हणाले की, दलित आणि उपेक्षितांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. हाथरसमध्ये जे झाले ते उत्तर प्रदेश सरकारसाठी लाजिरवाणे आहे. एका दलित तरुणीला न्याय देण्यासाठी जर पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागत असेल, तर यापेक्षा लाजिरवाणी बाब एखाद्या राज्य सरकारसाठी काय असू शकते? दिल्लीतील नेतृत्वाने हस्तक्षेप केल्याशिवाय या देशातील दलित आणि वंचितांना न्याय मिळू शकत नाही काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

जदयुचे नेते त्यागी म्हणाले की, हाथरस प्रकरणातील मुलीला गंभीर परिस्थितीनंतरही एम्समध्ये दाखल करण्यात आले नाही. पीडितेच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोक तिचे अंत्यदर्शन करू शकले नाहीत. कुटुंबाला अंत्यसंस्कार करू दिले नाही. अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस हास्यविनोद करीत होते. अत्याचार झालाच नाही, असे दावे आता केले जात आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत हाथरसचा मुद्दा विरोधक उचलून धरणार आहेत. राजदच्या निशाण्यावर जदयु आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी भाजपसोबतच जदयुवरही निशाणा साधला आहे. बिहारमध्ये जवळपास १६ टक्के मतदार दलित आहेत. अशा वेळी जदयुला फटका बसण्याची भीती वाटत आहे.पीडितेच्या काकांच्या छातीवर जिल्हाधिकारी यांनी मारली लाथहाथरस : मुलीच्या नातेवाईकांना पोलिसांनी अजूनही घरात कोंडून ठेवले असून तिच्या काकाच्या छातीवर जिल्हाधिकारी प्रवीण लष्कर यांनी लाथ मारली. त्यामुळे काका बेशुद्ध पडले. पीडितेच्या घरातील सर्वांचे मोबाइल काढून घेण्यात आले आहेत अशी माहिती त्या गावातून लपूनछपून बाहेर आलेल्या एका मुलाने पत्रकारांना दिली.या मुलाने सांगितले की, हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण लष्कर यांनी दलित मुलीच्या काकाच्या छातीवर लाथ मारली. मुलीच्या घरच्या मंडळींनी आपल्याला पत्रकारांकडे पाठविले असल्याचा दावाही या मुलाने केला. पीडितेच्या घरच्या मंडळींना पत्रकारांशी बोलण्यास पोलिसांनी मज्जाव केला आह.े अशी माहितीही या मुलाने दिली. मात्र आपण कोणालाही लाथ मारली नसल्याचे प्रवीण लष्कर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :hathras-pcहठ्रासRapeबलात्कार