हरयाणामध्ये ट्रकने वाहनांना चिरडले; 12 जणांचा मृत्यू, सात जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 20:11 IST2018-11-04T20:11:06+5:302018-11-04T20:11:32+5:30

हरयाणामधील सोनीपत भागात मोठा अपघात झाल्याची घटना रविवारी घडली. एका ट्रकने काही गाड्यांना टक्कर दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Haryana: Truck on wrong side of road rams into car, 2 bikes in Sonipat; 12 killed, 7 injured | हरयाणामध्ये ट्रकने वाहनांना चिरडले; 12 जणांचा मृत्यू, सात जण जखमी

हरयाणामध्ये ट्रकने वाहनांना चिरडले; 12 जणांचा मृत्यू, सात जण जखमी

सोनीपत: हरयाणामधील सोनीपत भागात मोठा अपघात झाल्याची घटना रविवारी घडली. एका ट्रकने काही गाड्यांना टक्कर दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोनीपत भागातील गोहाना-पानीपत हायवेवर मुंडलाना गावाजवळ हा अपघात घडला. गोहाना-पानीपत हायवेवर ट्रक विरुद्ध दिशेन येत असताना काही गाड्यांना टक्कर दिली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.




दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 

Web Title: Haryana: Truck on wrong side of road rams into car, 2 bikes in Sonipat; 12 killed, 7 injured

टॅग्स :Accidentअपघात