"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:05 IST2025-05-08T15:04:13+5:302025-05-08T15:05:00+5:30
७ मे रोजी जम्मूतील पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हरियाणातील पलवल येथील दिनेश कुमार शर्मा शहीद झाले.

"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
पाकिस्तान आणि पीओकेमध्ये भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमुळेपाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. यामध्ये एक जवान शहीद झाला. तसेच १३ जणांचा मृत्यू झाला.
७ मे रोजी जम्मूतील पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हरियाणातील पलवल येथील दिनेश कुमार शर्मा शहीद झाले. त्यांच्या शहीद होण्याची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांची अवस्था वाईट आहे.
"माझा मुलगा शहीद झाला"
दिनेश कुमार शर्मा यांचे वडील दया चंद यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, माझा मुलगा शहीद झाला आहे. त्याचा भाऊही सैन्यात आहे. जर ते दोघेही गेले तर मी देशासाठी स्वतःचं बलिदान देईन. मी लोकांना सांगेन की त्यांनी त्यांच्या मुलांना सैन्यात पाठवावं. मी हे अभिमानाने सांगतो.
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली"
शहीद दिनेश कुमार यांच्या पत्नी सीमा म्हणाल्या की, मी काल रात्री त्यांच्याशी बोलले होते, ते सांगत होते की ते मला १२ वाजता फोन करतील. मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, त्याचा फोन आला नाही. मी वाट पाहत राहिले. सीमा ढसाढसा रडू लागल्या.
"ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर करत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ऐशन्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "ऑपरेशन सिंदूर हे आमच्या वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर आहे, ज्यामध्ये शुभम आणि माझ्यासारख्या इतर महिलांचे पती दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. आमचं कुंकू आता शौर्य आणि देशभक्तीचा संकल्प बनलं आहे" असं म्हटलं.