धक्कादायक! ९ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म? पोलिसांनी सांगितलं व्हायरल Video चं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:06 IST2026-01-21T09:05:40+5:302026-01-21T09:06:32+5:30

सोशल मीडियावर सध्या नऊ वर्षांच्या मुलीने बाळाला जन्म दिल्याचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

haryana news 9 year old girl became mother in kaithal police deny claim | धक्कादायक! ९ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म? पोलिसांनी सांगितलं व्हायरल Video चं 'सत्य'

धक्कादायक! ९ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म? पोलिसांनी सांगितलं व्हायरल Video चं 'सत्य'

सोशल मीडियावर सध्या नऊ वर्षांच्या मुलीने बाळाला जन्म दिल्याचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका रुग्णालयात लहान मुलीच्या कुशीत एक नवजात बाळ असल्याचं दिसत आहे. हरियाणाच्या कैथलमध्ये ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान पोलीस ठाण्याच्या प्रभारी गीता यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, मुलीच्या भावानेच तिच्यासोबत चुकीचं कृत्य केलं, ज्यामुळे ती गर्भवती झाली आणि आता बाळाला जन्म दिला आहे. मात्र आता कैथल पोलिसांनी या व्हिडिओचं पूर्णपणे खंडन केलं आहे.

नऊ वर्षांच्या मुलीच्या बाळंतपणाची ही धक्कादायक घटना कैथल जिल्ह्यातील असल्याचं दाखवलं जात आहे. परंतु, प्रत्यक्षात या व्हायरल व्हिडिओचा कैथल जिल्ह्याशी कोणताही संबंध नाही. या प्रकरणाची दखल घेत कैथलचे डीएसपी ललित यादव यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून स्पष्टीकरण दिलं आहे.

सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असलेला व्हिडिीओ कैथल जिल्ह्याचा नाही. कैथल पोलीस या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाहीत आणि अशा अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहेत असं म्हटलं.

पोलीस अधिकारी ललित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोशल मीडियावर एक ९ वर्षांची मुलगी आई झाल्याचा व्हिीओ व्हायरल होत आहे, जो कैथलचा असल्याचं सांगितलं जात आहे. आम्ही याची दखल घेऊन माहिती गोळा केली असता आम्हाला समजलं की, हा व्हिडीओ कैथलशी संबंधित नाही आणि आम्ही याला अधिकृत मानत नाही."

"जी दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे ती पूर्णपणे असत्य आहे. या व्हिडिओचा कैथलशी कोणताही संबंध नाही आणि भविष्यात असे काही आढळल्यास आम्ही निश्चितपणे कडक कारवाई करू." नऊ वर्षांच्या मुलीचा आणि मुलीचा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


 

Web Title : वायरल वीडियो: 9 साल की बच्ची ने दिया जन्म? पुलिस ने बताई सच्चाई

Web Summary : हरियाणा में 9 साल की बच्ची के जन्म देने का एक वीडियो वायरल हुआ। पुलिस ने जांच कर स्पष्ट किया कि वीडियो कैथल, हरियाणा का नहीं है, और दावे झूठे हैं। उन्होंने गलत सूचना फैलाने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई की चेतावनी दी।

Web Title : Viral Video: 9-Year-Old Giving Birth? Police Reveal the Truth

Web Summary : A video claiming a 9-year-old gave birth in Haryana went viral. Police investigated and clarified that the video isn't from Kaithal, Haryana, and the claims are false. They warned of legal action against those spreading misinformation.