गुरुग्राममध्ये चार मजली इमारत कोसळली, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 09:22 IST2019-01-24T08:05:31+5:302019-01-24T09:22:12+5:30

हरयाणातील गुरुग्राममध्ये चार मजल्यांची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली पाच जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Haryana: More than five people trapped after a four-storey building collapsed in | गुरुग्राममध्ये चार मजली इमारत कोसळली, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

गुरुग्राममध्ये चार मजली इमारत कोसळली, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

ठळक मुद्देहरयाणातील गुरुग्राममध्ये गुरुवारी चार मजल्यांची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.ढिगाऱ्याखाली पाच ते आठ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. NDRF च्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे. 

हरयाणा - हरयाणातील गुरुग्राममध्ये गुरुवारी (24 जानेवारी) चार मजल्यांची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच NDRF च्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूग्राम येथील उल्लावास गावात ही इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली पाच ते आठ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची तीन पथकं घटनास्थळी दाखल झाली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारत कोसळल्याने आजूबाजूच्या परिसराचे नुकसान झाले आहे.




 

Web Title: Haryana: More than five people trapped after a four-storey building collapsed in