धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 13:11 IST2018-08-30T13:09:52+5:302018-08-30T13:11:10+5:30

एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

haryana gurugram family of four including one year old toddler found dead under mysterious circumstances | धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू 

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू 

गुरूग्राम - हरियाणामधील गुरुग्राम येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धक्कदायक बाब म्हणजे,  मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पतौडी तालुक्यातील ब्रीजपुरा गावातील ही घटना आहे. बुधवारी (29 ऑगस्ट) रात्री सुमारास ही घटना उजेडात आली. एका महिलेचा मृतदेह मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आणि दोन मृतदेह जमिनीवर पडलेले होते.  

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळाहून एकूण तीन मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते व एका वर्षाच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

दरम्यान, या घटनेबाबत अद्यापपर्यंत ठोस माहिती मिळालेली नसून  पोलीस घटनेचा तपास करत आहेत.  



 

Web Title: haryana gurugram family of four including one year old toddler found dead under mysterious circumstances