हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:19 IST2025-07-14T15:17:39+5:302025-07-14T15:19:45+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हरयाणा, गोवा आणि लडाख या केंद्र शासित प्रदेशात नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.

हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
प्रा. अशीम कुमार घोष, पुसपती अशोक अशोक गजपती राजू आणि कविंदर गुप्ता यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. कविंदर गुप्ता यांची नियुक्ती नायब राज्यपाल म्हणून करण्यात आली आहे. दरम्यान, लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडिअर (निवृ्त्त) बी.डी. मिश्रा यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, प्रा. अशीम कुमार घोष यांची हरयाणाचे राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुसपती अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी उपमुख्यमंत्री लडाखचे नवे राज्यपाल
राष्ट्रपतींकडून जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांची लडाख केंद्र शासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लडाखचे नायब ब्रिगेडियर (सेवा निवृ्त्त) बी.डी. मिश्रा यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नवीन नियुक्ती करण्यात आली. त्यांचा राजीनामा स्विकारत राष्ट्रपतींकडून गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली.