'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 14:45 IST2024-09-30T14:44:51+5:302024-09-30T14:45:38+5:30
...यावेळी राहुल गांधींनी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
हरियाणा विधानसभा निवडणुकीत आता सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण शक्ती झोकून दिल्याचे दिसत आहे. यातच सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा विधानसभेतील विरोधीपक्ष नते राहुल गांधी तथा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील नारायणगड येते एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकार श्रीमंतांच्या खात्यात धडाधड पैसे पाठवत आहे. याशिवाय, शेतकरी कायदे आले तेव्हा केंद्र सरकार म्हणत होते, हे कायदे शेतकऱ्यांसाठी आहेत. हे कायदे शेतकऱ्यांसाठी आहेत, तर मग शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर का? लोकसभा निवडणुकीत 'खटाखट' शब्द जबरदस्त प्रसिद्द झाला होता. आता या निवडणुकीत 'धडधड' शब्दाची एंट्री झाली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनीही केंद्र सराकरवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, 'येथे एवढी मोठी बेरोजगारी आहे, मला सांगायची आवश्यकता नाही, येथील तरुण कष्टाळू आहेत, येथील तरुण मोठ्या शहरांमध्ये काम करत आहेत. येथून स्थलांतरित होतात. तरुणांना काय मिळाले, बेरोजगारी मिळाली, अग्निवीर सारखी योजना मिळाली, यात सांगण्यात आले की, आपण सीमेवर जाल, शहीद होण्यासाठी तयार राहाल, तरीही आपल्याला काही मिळणार नाही."