शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 05:47 IST

मायावतींची जादू गायब, छोटे पक्ष उरले फक्त मते खाण्यासाठी

चंडीगड : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला ३९.९३ टक्के मते मिळाली असून, ४८ जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. त्याच वेळी काँग्रेसलाही जवळपास तितकीच म्हणजे ३९.०९ टक्के मते मिळाली असताना काँग्रेसचे ३७ उमेदवार जिंकले आहेत. त्यामुळे अतिशय कमी मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला असून, यासाठी छोटे पक्ष कारणीभूत ठरल्याचे आकडेवारीतून लक्षात येते.

हरयाणात २.०४ कोटी मतदार मतदानासाठी पात्र होते. येथे ६५ टक्के मतदान झाले होते. भाजपचे १० आमदार ५ हजारांपेक्षा कमी फरकाने जिंकून आले आहेत. २ हजारपेक्षा कमी मतांनी १ आमदार जिंकले आहेत. याचवेळी काँग्रेसचे ३ आमदार २ हजारपेक्षा कमी मतांनी निवडून आले आहेत. १ हजारांपेक्षा कमी मतांनी १ आमदार निवडून आले, तर ५ हजारांपेक्षा कमी मतांनी २ आमदार निवडून आले आहेत.

मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची जादू चाललेली नाही. या निवडणुकीत नोटाला मतदारांनी नाकरले असून, केवळ ०.३८ टक्के मते नोटाला मिळाली आहेत.

भाजप का जिंकली?

हरयाणाच्या राजकारणात जाट अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. शेतकरी आंदोलन आणि नंतर कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे जाट मतदार भाजपवर नाराज होते. भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्यामुळे काँग्रेसला जाट मते जास्त मिळतील, असे मानले जात होते. अशा परिस्थितीत भाजपने ओबीसींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला.

गोड जिलेबी राहुल गांधींसाठी ठरली कडू

निवडणुकीत काँग्रेस हरण्याच्या मार्गावर असताना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वत्र जिलेबीचीच चर्चा सुरू झाली. राहुल गांधींनी हरयाणाच्या प्रचारादरम्यान मातुरामच्या जिलेबीचा उल्लेख केला होता. काँग्रेस नेते हुड्डा यांनी  गोहाना शहरातील लाला मातुराम हलवाई या लोकप्रिय दुकानातील जिलेबी राहुल गांधींना भेट म्हणून दिल्या होत्या. त्यावर आज मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम जिलेबी खाल्ली आहे. प्रत्येकाला ही जिलेबी खायला मिळाली पाहिजे. त्यामुळे कारखान्यात जिलेबी तयार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे जिलेबी हा राजकीय विजय बनला. भाजपनेही यानंतर त्यांना ट्रोल केले.

जजपाचा ‘किंगमेकर’ ते थेट सुपडासाफ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर हरयाणामध्ये सरकार स्थापन करण्यात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावलेल्या जननायक जनता पक्षाला (जजपा) पाच वर्षांनंतर राज्यातून नामशेष होण्यामुळे मोठा धक्का बसला आहे. जजपा नेते आणि माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. गेल्या विधानसभेत जजपाने ९० पैकी १० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली. मात्र, ही युती खट्टर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यानंतर तुटली होती.

हरयाणा  गेल्या पाच निवडणुकांचा इतिहास काय सांगतो?

पक्ष    २०१९    २०१४    २००९    २००५ भाजप    ४०    ४७    ०४    ०२ काँग्रेस    ३१    १५    ४०    ६७ जजपा    १०    ००    ००    ०० लोकदल    ०१    १९    ३१    ०९ जनहित काँग्रेस    ००    ०२    ००      ००बसपा    ००    ०१    ०१    ०१ शिरोमणी अकाली दल    ००    ०१    ०१     ००अपक्ष    ०७    ०५    ०७    १०

 

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस