शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

हरयाणात निर्भया प्रकरण; 15 वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 10:47 IST

दिल्लीतील निर्भयाप्रकरणासारखीच घटना हरयाणातील जिंद जिल्ह्यात घडली आहे.

कुरुक्षेत्र- दिल्लीमध्ये घडलेलं निर्भया प्रकरण आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. दिल्लीतील निर्भयाप्रकरणासारखीच घटना हरयाणातील जिंद जिल्ह्यात घडली आहे. जिंदमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. पीडित मुलीवर अमानूष अत्याचार केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणामुळे हरयाणात संताप व्यक्त केला जातो आहे. पीडीत मुलीच्या शरीरावर एकुण 19 जखमा आढळून आल्या आहेत. तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, छातीवर व हातावर जास्त जखमा आहेत, अशी माहिती डॉक्टर एस.के दत्तरवाल यांनी दिली आहे. 

कुरुक्षेत्रमध्ये राहणारी 15 वर्षांची मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. 9 जानेवारीपासून ती बेपत्ता होती. गावातील एक २० वर्षांचा तरुणही त्याच दिवशी घरातून निघून गेला. त्यामुळे हे दोघंही पळून गेले असावेत, असा संशय मुलीच्या आई-वडिलांना आला. यानंतर त्यांनी संबंधित तरुणाविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.

शुक्रवारी जिंदमध्ये एका कालव्यात एका मुलीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. पोलीस तपासात हा मृतदेह कुरुक्षेत्रमधील १५ वर्षांच्या मुलीचा असल्याचं स्पष्ट झालं. रविवारी रोहतकमधील वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीचं शवविच्छेदन करण्यात आलं. पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं आहे. पीडित मुलीच्या गुप्तांग आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा असून त्या जखमा पाहता नराधमांनी तिच्यावर अमानूष अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी  पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली चार तपास पथके स्थापन करण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या घटनेमुळे हरयाणात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातो आहे.  पीडित मुलगी ही दलित समाजातील असून ज्या तरुणाविरोधात अपहरणाची तक्रार दाखल झाली तोसुद्धा याच समाजातील आहे. या प्रकरणातील 20 वर्षीय तरूणत संशयित आरोपी असला तरी त्यानंच हे कृत्य केल्याचा ठोस पुरावा मिळालेला नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, मुलीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि आई-वडिलांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, हरयाणातील मंत्री के के बेदी यांनी मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. बेदींनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारHaryanaहरयाणाPoliceपोलिसNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप