शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

“काँग्रेस कोणाचा गुलाम होऊ शकत नाही, प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 10:08 AM

राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम आहे.

ठळक मुद्देप्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावेकाँग्रेस पक्ष कोणाही एका व्यक्तीचा गुलाम होऊ शकत नाहीममता बॅनर्जी जे काही करत आहेत, त्यामुळे विरोधकांचे ऐक्य मजबूत होणार नाही

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस (Congress) पक्षातील अंतर्गत कुरबुरी सातत्याने चव्हाट्यावर येत असून, त्यातून दिलासा मिळण्याऐवजी भरच पडत चालल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीमधील एक सदस्य असलेल्या हरीश रावत (Harish Rawat) यांनी भाष्य केले आहे. काँग्रेस पक्ष कोणाचाही गुलाम होऊ शकत नाही. त्यांनी आधी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि नंतरच आपले ज्ञान पाजळावे, अशी टीका हरीश रावत यांनी प्रशांत किशोर यांच्यासंदर्भात केली आहे.  

हरीश रावत यांच्या या भूमिकेनंतर आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच वादाला नवे तोंड फुटू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तृणमूल काँग्रेसकडून नेत्यांना लालूच दाखवून पक्षात प्रवेश करून घेतला जात आहे. हा सगळा काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ममता बॅनर्जी जे काही करत आहेत, त्यामुळे विरोधकांचे ऐक्य मजबूत होणार नाही, असेही रावत यांनी म्हटले आहे. 

प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे

प्रशांत किशोर यांच्याबाबत बोलताना हरीश रावत म्हणाले की, कोणतीही व्यक्ती जी भारताची नागरिक आहे आणि स्वतंत्रता आंदोलन तसेच काँग्रेसवर, काँग्रेस विचारसरणीवर विश्वास ठेवणारी आहे, ती व्यक्ती पक्षात प्रवेश करू शकते. त्यामुळे प्रशांत किशोरही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. आम्ही नेहमीच नवीन विचारांचे स्वागत केले आहे. मात्र, काही झाले, तरी काँग्रेस पक्ष कोणाही एका व्यक्तीचा गुलाम होऊ शकत नाही. ती व्यक्ती कितीही सक्षम असली, तरी आता सगळे तुम्हीच सांभाळा, असे काँग्रेसमधील कोणीही म्हणणार नाही. आधी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि नंतर ज्ञान द्यावे, असा टोला हरीश रावत यांनी लगावला आहे. ते इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होते. 

दरम्यान, संसदेतील विरोधी पक्ष काँग्रेसच्या कार्यकारणीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या नवीन अध्यक्ष निवडीवर निर्णय घेतला जाऊ शकतो. काँग्रेस कार्यकारणीच्या या बैठकीत कुठल्याही शिस्तभंगाच्या कारवाईवर चर्चा होणार नाही. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत विचारविनिमय केला जाणार आहे. काँग्रेसच्या कार्यकारणीच्या या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो. यात अध्यक्ष पदासाठी निवडणूकही घेतली जाण्याची शक्यता आहे. तसेच पक्षात सर्वांना सामावून घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोर