शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षांचा अथांग सन्नाटा संपला! हरीश राणावर अंत्यसंस्कार, वडिलांनी अखेरचा मेसेज केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 10:28 IST

Harish Rana last rites: १३ वर्षांनंतर हरीश राणाचा संघर्ष संपला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एम्समध्ये 'पॅसिव्ह युथनेशिया'द्वारे मृत्यू. गाझियाबादमधील इंजिनीअरिंग विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी.

२०१३ पासून कोमात असलेल्या आणि केवळ मशीनच्या सहाय्याने श्वास घेणाऱ्या हरीश राणाचा (३७) संघर्ष मंगळवारी सायंकाळी ४:१० वाजता संपला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक परवानगीनंतर दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला 'निष्क्रिय इच्छामृत्यु' देण्यात आला. बुधवारी सकाळी दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंजाब विद्यापीठात बीटेकचे शिक्षण घेत असताना हरीश हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली आणि तो कोमात गेला. तेव्हापासून सलग १३ वर्षे तो 'लाईफ सपोर्ट सिस्टम'वर होता. कुटुंबाने त्याला शुद्धीवर आणण्यासाठी जीवाचे रान केले, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल११ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हरीशच्या पालकांची याचिका मान्य करत त्याला 'निष्क्रिय इच्छामृत्यु' देण्याची परवानगी दिली. १४ मार्च रोजी त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले. डॉ. सीमा मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील विशेष टीमने अत्यंत संवेदनशीलतेने त्याचे लाईफ सपोर्ट सिस्टम हळूहळू हटवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या दरम्यान त्याला कोणतीही वेदना होऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्यात आली.

वडिलांचा 'तो' मेसेज वाचून डोळे पाणावलेहरीशचे वडील अशोक राणा यांनी सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मुलाच्या निधनाची बातमी देताना लिहिले, "उद्या सकाळी ९ वाजता हरीश राणा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील... ॐ शांती..." हा छोटासा मेसेज वाचून गाझियाबादमधील राजनगर एक्स्टेंशन परिसरातील नागरिक भावुक झाले. गेली १३ वर्षे या कुटुंबाने सोसलेल्या कष्टांची जाणीव असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Harish Rana's 13-Year Coma Ends: Passive Euthanasia Granted, Last Rites Performed

Web Summary : Harish Rana, in a coma since 2013 after an accident, passed away after the Supreme Court granted passive euthanasia. His last rites were performed in Delhi. His father's message announcing his death moved the community, who had witnessed the family's long struggle.
टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्ली