१३ वर्षांचा अथांग सन्नाटा संपला! हरीश राणावर अंत्यसंस्कार, वडिलांनी अखेरचा मेसेज केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 10:28 IST2026-03-25T10:27:51+5:302026-03-25T10:28:29+5:30

Harish Rana last rites: १३ वर्षांनंतर हरीश राणाचा संघर्ष संपला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एम्समध्ये 'पॅसिव्ह युथनेशिया'द्वारे मृत्यू. गाझियाबादमधील इंजिनीअरिंग विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी.

Harish Rana last rites: 13 years of profound silence are over! Harish Rana's funeral, father sends last message... | १३ वर्षांचा अथांग सन्नाटा संपला! हरीश राणावर अंत्यसंस्कार, वडिलांनी अखेरचा मेसेज केला...

१३ वर्षांचा अथांग सन्नाटा संपला! हरीश राणावर अंत्यसंस्कार, वडिलांनी अखेरचा मेसेज केला...

२०१३ पासून कोमात असलेल्या आणि केवळ मशीनच्या सहाय्याने श्वास घेणाऱ्या हरीश राणाचा (३७) संघर्ष मंगळवारी सायंकाळी ४:१० वाजता संपला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक परवानगीनंतर दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला 'निष्क्रिय इच्छामृत्यु' देण्यात आला. बुधवारी सकाळी दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंजाब विद्यापीठात बीटेकचे शिक्षण घेत असताना हरीश हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली आणि तो कोमात गेला. तेव्हापासून सलग १३ वर्षे तो 'लाईफ सपोर्ट सिस्टम'वर होता. कुटुंबाने त्याला शुद्धीवर आणण्यासाठी जीवाचे रान केले, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
११ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हरीशच्या पालकांची याचिका मान्य करत त्याला 'निष्क्रिय इच्छामृत्यु' देण्याची परवानगी दिली. १४ मार्च रोजी त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले. डॉ. सीमा मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील विशेष टीमने अत्यंत संवेदनशीलतेने त्याचे लाईफ सपोर्ट सिस्टम हळूहळू हटवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या दरम्यान त्याला कोणतीही वेदना होऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्यात आली.

वडिलांचा 'तो' मेसेज वाचून डोळे पाणावले
हरीशचे वडील अशोक राणा यांनी सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मुलाच्या निधनाची बातमी देताना लिहिले, "उद्या सकाळी ९ वाजता हरीश राणा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील... ॐ शांती..." हा छोटासा मेसेज वाचून गाझियाबादमधील राजनगर एक्स्टेंशन परिसरातील नागरिक भावुक झाले. गेली १३ वर्षे या कुटुंबाने सोसलेल्या कष्टांची जाणीव असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आले.

Web Title : हरीश राणा का 13 साल का कोमा खत्म: निष्क्रिय इच्छामृत्यु, अंतिम संस्कार

Web Summary : 2013 से कोमा में रहे हरीश राणा का सुप्रीम कोर्ट द्वारा निष्क्रिय इच्छामृत्यु की अनुमति के बाद निधन हो गया। दिल्ली में उनका अंतिम संस्कार किया गया। उनके पिता के संदेश ने समुदाय को भावुक कर दिया, जिसने परिवार का लंबा संघर्ष देखा था।

Web Title : Harish Rana's 13-Year Coma Ends: Passive Euthanasia Granted, Last Rites Performed

Web Summary : Harish Rana, in a coma since 2013 after an accident, passed away after the Supreme Court granted passive euthanasia. His last rites were performed in Delhi. His father's message announcing his death moved the community, who had witnessed the family's long struggle.