बापरे! घरात अन्नाचा दाणा नाही अन् मजुराला आली ७ कोटींची इन्कम टॅक्स नोटीस; कुटुंब हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:49 IST2026-01-20T10:48:31+5:302026-01-20T10:49:10+5:30

इन्कम टॅक्स विभागाने एका मजुराला तब्बल ७ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ७ कोटींची नोटीस मिळाल्यापासून मजुराचे संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे.

hardoi income tax department sent notice of 7 crore rupees to laborer | बापरे! घरात अन्नाचा दाणा नाही अन् मजुराला आली ७ कोटींची इन्कम टॅक्स नोटीस; कुटुंब हादरलं

फोटो - ABP News

उत्तर प्रदेशातील हरदोईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे इन्कम टॅक्स विभागाने एका मजुराला तब्बल ७ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ७ कोटींची नोटीस मिळाल्यापासून मजुराचे संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे. जो माणूस दिवसभर मजुरी करून दोन वेळच्या जेवणाची सोय करतो, त्याला विभागाने कोट्यवधी रुपयांच्या टॅक्सची नोटीस दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माधौगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुदामऊ गावात राहणाऱ्या गोविंदच्या घरी जेव्हा इन्कम टॅक्स विभागाचं पथक नोटीस घेऊन पोहोचल, तेव्हा सर्वांचे धाबे दणाणले. विभागाने गोविंदला ७ कोटी १५ लाख ९२ हजार ७८६ रुपयांची नोटीस दिली आहे.

एकीकडे घरात अन्नाचा दाणा नाही आणि दुसरीकडे कोट्यवधींच्या टॅक्सची ही नोटीस पाहून कुटुंब धक्क्यात आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. नोटीस पाहून कुटुंबाला खूपच मोठा धक्का बसला. गोविंदची झोप उडाली आहे. तर पत्नी सोनी देवी आणि वृद्ध आई-वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. 

सरकारी मदतीच्या नावाखाली मोठी फसवणूक

गोविंद ६ वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कानपूरला गेला होता. तिथे मजुरी करत असताना त्याला एक आमिष दाखवण्यात आलं. दारिद्र्यरेषेखालील लोकांना सरकारी मदत मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेने त्याला जाळ्यात ओढलं आणि सीतापूरमधील बिसवा येथे नेलं. तिथे एचडीएफसी (HDFC) बँकेत त्याचं खातं उघडण्यात आले. या बदल्यात गोविंदला केवळ दोन-तीन हजार रुपये मिळाले होते.

गोविंदच्या नावावर बोगस कंपनी

गोविंद ही घटना विसरून गेला होता, पण ज्या बँकेचं पासबुक आणि चेकबुक त्याने इतरांच्या हाती सोपवलं, तेच भविष्यात त्याच्यासाठी संकट ठरेल याची त्याला कल्पना नव्हती. फसवणूक करणाऱ्या गँगने गोविंदच्या नावावर बोगस कंपनी बनवून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले आणि या गरीब मजुराला बळीचा बकरा बनवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोविंदचा मोठा भाऊ हातगाडी चालवतो तर धाकटा भाऊ मजुरी करतो.

Web Title : यूपी में गरीब मजदूर को मिला ₹7 करोड़ का इनकम टैक्स नोटिस, परिवार सदमे में

Web Summary : उत्तर प्रदेश में एक मजदूर को ₹7 करोड़ का इनकम टैक्स नोटिस मिला, जिससे उसका परिवार सदमे में है। उसे सरकारी सहायता के झूठे वादे के तहत बैंक खाता खोलने के लिए बहकाया गया था। अनजाने में, एक धोखाधड़ी योजना ने उसके खाते का इस्तेमाल अवैध लेनदेन के लिए किया, जिससे वह असुरक्षित हो गया।

Web Title : Poor Laborer in UP Shocked by ₹7 Crore Income Tax Notice

Web Summary : A laborer in Uttar Pradesh received a ₹7 crore income tax notice, shocking his family. He was lured into opening a bank account under the false promise of government aid. Unknowingly, a fraudulent scheme used his account for illegal transactions, leaving him vulnerable.