शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाणार; लोकसभाही लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 10:53 AM

पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून 2015 मध्ये आंदोलन उभे राहिले होते.

बडोदा : गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविणार असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. 

12 मार्चला अहमदाबाद येथे काँग्रेसची बैठक होणार आहे. यावेळी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. या बैठकीला काँग्रेसते अध्यक्ष राहुल गांधीदेखील उपस्थित राहणार आहेत. ज्या जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल उभ राहणार आहेत तेथून सध्या भाजपाच्या पूनमबेन मादम खासदार आहेत. 

बैठकीनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते एका सभेला संबोधित करणार आहेत. गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असून विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने त्यांना नाकीनऊ आणले होते. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला मोठी मदत केली होती. यामुळे काँग्रेस गुजरातमध्ये लक्ष केंद्रीत करणार आहे. 

हार्दिक पटेल यांनी 21 फेब्रुवारीला उत्तरप्रदेशमध्ये सपा मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते. महत्वाचे म्हणजे या युतीमध्ये काँग्रेसला वगळण्यात आले आहे. 

गुजरात मॉडेलचे खरे रुप...हार्दिक पटेल यांनी यावेळी तथाकथीत गुजरात मॉडेलवरही टीका केली होती. आज जे गुजरात मॉडेल अवघ्या देशभरात खपवले जात आहे. त्याच गुजरातच्या 20 जिल्ह्यांमध्ये शेतासाठी पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. आज शेतकरी, तरुण, महिला सर्व त्रासलेले आहेत. जो ही सरकारला प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही ठरविले जाते. आम्हाला या लोकांनी देशभक्ती काय असते हे शिकविण्याची गरज नाही, असेही हार्दिक यांनी म्हटले आहे. 

पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून 2015 मध्ये आंदोलन उभे राहिले होते. यावेळी हिंसाही झाली होती. तसेच चिथावणी दिल्याने झालेल्या तोडफोडप्रकरणी हार्दिक पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९