शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शीख जवानाच्या पगडीचा अपमान झाल्याने भज्जी भडकला, कारवाईची केली मागणी

By बाळकृष्ण परब | Published: October 09, 2020 8:52 PM

West Bengal News : या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हरभजन सिंहने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये एका शीख सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याच्या पगडीचा अपमान करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरलभाजपाचे नेते प्रियांगू पांडे यांच्या सुरक्षेत तैनात असलेले शीख जवान बलविंदर सिंग यांची पगडी खेचण्यात आल्याचा व्हिडीओ समोरया व्हिडीओमध्ये कोलकाता पोलीस या सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहेत

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सुरक्षेत तैनात असलेल्या एका शीख जवानाला मारहाण करत त्याच्या पगडीचा अपमान करण्यात आल्याने क्रिकेटपटू हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.पश्चिम बंगालमध्ये एका शीख सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याच्या पगडीचा अपमान करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते प्रियांगू पांडे यांच्या सुरक्षेत तैनात असलेले शीख जवान बलविंदर सिंग यांची पगडी खेचण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोलकाता पोलीस या सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहेत. यादम्यान, सरद जवानाची पगडी सुटत असल्याचे दिसत आहे. आता या प्रकरणाती दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र या व्हिडीओबाबत पश्चिम बंगाल पोलिसांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

दिल्लीतील भाजपा नेते इंप्रित सिंग बख्शी यांनी ट्विट करून सांगितले की, प्रियांगू पांडे यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या बलविंदर सिंग यांची पगडी खेचून उतरवणे आणि रस्त्यावर फरफटत नेऊन मारणे या गोष्टी पश्चिम बंगाल पोलिसांचे क्रौर्य दाखवणाऱ्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत कारवाई केली पाहिजे. याच पगडीवाल्यांनी बांगलादेशची निर्मिती केली होती. 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSoldierसैनिकHarbhajan Singhहरभजन सिंग