शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

अभिरुची बदलल्याने दर्जेदार गीतसंगीत हरविले (भाग २)

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नागपूर माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखेच

नागपूर माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखेच
या महोत्सवासाठी बऱ्याच वर्षांनी नागपुरात येणे झाले. इथे नेहमीच यावेसे वाटते पण देवाच्या मर्जीप्रमाणेच आपण पोहोचू शकतो. येथे अनेक मोठे कवी झाले. त्यांच्या नगरीत येणे म्हणजे देवस्थानालाच भेट देण्यासारखे आहे. कविश्रेष्ठ सुरेश भट, ग्रेस हे मराठीतले श्रेष्ठ कवी इथलेच होते. त्यांच्या कवितांमधून ते आजही भेटतात. त्यांना भेटण्यासाठी बरेचदा नागपूरला येणे व्हायचे. त्यामुळेच नागपूर आवडते आणि येथील दर्दी रसिकही आवडतात. येथे गाणे सादर करण्यात आनंद वाटतो, असे आशाताई म्हणाल्या.
--------------
राजकारण हे माझे क्षेत्र नाही
मला राजकारणात कधीही यावेसे वाटले नाही. तो माझा स्वभावच नाही. राजकारण फार वेगळ्या लोकांसाठी आहे कदाचित ती गुणवत्ता माझ्याजवळ नाही. त्यात माझा स्वभाव अजिबातच राजकारणी नाही. आपल्या मनात जे येईल ते बोलून आपण मोकळे होतो. आपल्या घरातलेच राजकारण समजून घेता आले तरी पुरे, असे मला वाटते. मनमोकळे राहण्यातच तर खरी गंमत आहे. या वयातही मी गाणे म्हणते आणि लोकांना ते आवडते. लोक प्रेम करतात यापेक्षा अजून काय हवे? एखाद्या पुरस्कारापेक्षाही लोकांचे प्रेम मला जास्त महत्त्वाचे वाटते. देवाने भरभरून दिले असताना कशाला पुन्हा राजकारणात जायचे. आता मला काहीही मागायचे नाही आणि इच्छाही नाही.
----------
नागपूरकरांनी खूप प्रेम दिले
मुळात मंगेशकर कुटुंबाला नागपूर - विदर्भाने खूप प्रेम दिले आहे. त्याचा इतिहासच आहे. बळवंत नाट्य मंडळींसह माझे वडील दीनानाथ मंगेशकर येथे यायचे. त्यावेळी येथे दोन मजली नाट्यगृह होते. एकदा तर बाबांचे गाणे ऐकण्यासाठी इतकी गर्दी झाली की दुसरा मजलाच कोसळला होता. ही बाब मला आईने सांगितली. त्यावेळी मी खूपच लहान होते. त्यावेळी वडिलांना एका गीतासाठी २२ वेळा वन्समोअर मिळाला होता. त्यानंतर हृदयनाथवरही आणि माझ्यासह दीदींवरही विदर्भातल्या रसिकांनी खूप प्रेम केले. त्यामुळे विदर्भाशी आमचे ऋणानुबंध कायम जुळले आहेत. येथे आल्यावर मी भट आणि ग्रेस यांना खूप मिस करते.