पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 02:23 IST2019-03-24T02:23:27+5:302019-03-24T02:23:41+5:30

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठविला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा पाठविल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि स्वागत केले.

 Happy Prime Minister of Pakistan on National Day of Pakistan | पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठविला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा पाठविल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि स्वागत केले.
पाकच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमावर केंद्र सरकारने बहिष्कार घातला होता. मात्र पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दहशतवादाविरोधात व हिंसाचारमुक्ततेसाठी उपखंडातील जनतेने एकत्र येऊन शांतता, समृद्धी, विकास व लोकशाहीसाठी काम करणे आवश्यक आहे, असे मोदी यांनी इम्रान खान यांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे. दोन देशांमध्ये तणाव असताना मोदी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. इम्रान खान यांनी मोदी यांचा संदेश ट्विट केला. दोन देशांतील संबंध बिघडू नयेत आणि तणाव कमी व्हावा, यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे दिल्लीतील राजदूत सोहेल यांनीही राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात केले.

Web Title:  Happy Prime Minister of Pakistan on National Day of Pakistan