Happy Birthday Sonia Gandhi : सोनिया गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 13:48 IST2018-12-09T13:41:30+5:302018-12-09T13:48:21+5:30

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या घराबाहेर एकत्र येत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Sonia Gandhi pm modi wishes sonia gandhi on her birthday | Happy Birthday Sonia Gandhi : सोनिया गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव!

Happy Birthday Sonia Gandhi : सोनिया गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव!

ठळक मुद्देकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या घराबाहेर एकत्र येत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांना ट्वीटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली -  काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनीसोनिया गांधी यांच्या घराबाहेर एकत्र येत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांना ट्वीटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनिया गांधी यांना आरोग्यदायी आणि दिर्घायुष्यासाठी मी शुभेच्छा देतो असे मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

केंद्रातील आणि राज्यातील अनेक नेत्यांनी सोनिया गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच वाढदिवसानिमित्त पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्यासह भाजपातीलही अनेक नेत्यांनी त्यांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 9 डिसेंबर 1946 रोजी सोनियांचा इटलीत जन्म झाला. राजीव गांधींशी लग्न झाल्यानंतर त्या राजकारणापासून दूर होत्या. मात्र राजीव गांधींच्या हत्येनंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या. काँग्रेस अध्यक्षपदी 1998 मध्ये सोनिया यांची निवड करण्यात आली. 










 

Web Title: Happy Birthday Sonia Gandhi pm modi wishes sonia gandhi on her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.