'हनुमान कुस्ती खेळायचे, ते एक खेळाडू होते', भाजपा मंत्र्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 09:22 IST2018-12-24T09:19:47+5:302018-12-24T09:22:49+5:30

हनुमान कोण होते, याबाबत बोलताना चौहान यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला नाही.

'Hanuman wrestled, he was a player', BJP minister's claim | 'हनुमान कुस्ती खेळायचे, ते एक खेळाडू होते', भाजपा मंत्र्याचा दावा

'हनुमान कुस्ती खेळायचे, ते एक खेळाडू होते', भाजपा मंत्र्याचा दावा

नवी दिल्ली - रामभक्त हनुमान यांच्या जातीवरील चर्चेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. या वादात आणखी एका नेत्यानं उडी घेतली आहे. माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांनी हनुमान हे खेळाडू होते, असे म्हटले आहे. एका कार्यक्रमावरील चर्चेत हनुमान यांच्यावरील चर्चासत्रात बोलताना त्यांनी हे मत मांडले.

हनुमान कोण होते, याबाबत बोलताना चौहान यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला नाही. मात्र, हनुमान कुस्ती खेळत होते, ते एक खेळाडू होते. जेवढे भी पैलवान आहेत, ते सर्वच हनुमानाची पूजा करतात. त्यामुळे मीही त्यांना तेच मानतो, ते माझ्यासाठी पूजनीय आहेत. देवाची कुठलिही जात-पात नसते, त्यामुळे मी त्यांना कुठल्याही जातीच्या चौकटीत बांधू इच्छित नाही, असे चौहान यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होते, असा दावा केला होता. तर,  भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लीम होते, असे म्हटले आहे. तसेच योगी कॅबिनेटमधील आणखी एक मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हनुमान हे जाट समाजाचे होते, असा दावा केला आहे. 


 
 

Web Title: 'Hanuman wrestled, he was a player', BJP minister's claim