शाळेची फी भरता न आल्याने दोन मुलींसह वडिलांनी घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 06:58 IST2022-11-18T06:58:01+5:302022-11-18T06:58:20+5:30
येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शाळेची फी थकली होती. त्यामुळे वडील आणि दोन अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शाळेची फी भरता न आल्याने दोन मुलींसह वडिलांनी घेतला गळफास
गोरखपूर : येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शाळेची फी थकली होती. त्यामुळे वडील आणि दोन अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. जितेंद्र श्रीवास्तव (४५) हे आपल्या दोन मुली आणि वडील ओम प्रकाश यांच्यासोबत राहत होते. जितेंद्र हे घरी टेलरिंगचे काम करायचे. १९९९च्या रेल्वे अपघातात त्यांचा उजवा पाय कापला गेला होता.
मुलींचे वय केवळ १६ आणि १४
जितेंद्र शिवणकाम करत असत. त्यांच्या दोन्ही मुली मान्या (१६) आणि मानवी (१४) या इयत्ता नववी आणि सातव्या वर्गात शिकत होत्या. गेल्या पाच महिन्यांपासून दोन्ही मुलींची रु. ३७,००० फी वडील जितेंद्र हे भरू शकले नव्हते.