केस ओढले, नखांनी ओरबाडले, एकमेकींना लोळवून मारले, कॉलेजमधील विद्यार्थिनींचा भररस्त्यात तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:09 IST2025-09-11T16:08:45+5:302025-09-11T16:09:01+5:30
Jharkhand News: झारखंडमधील जमशेदपूर येथे कॉलेजमधील विद्यार्थिनींमध्ये घरी परतताना किरकोळ कारणांवरून वाद झाल्यानंतर त्यांनी एकमेकींना भररस्त्यात लोळवून लोळवून मारल्याची घडना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

केस ओढले, नखांनी ओरबाडले, एकमेकींना लोळवून मारले, कॉलेजमधील विद्यार्थिनींचा भररस्त्यात तुफान राडा
झारखंडमधील जमशेदपूर येथे कॉलेजमधील विद्यार्थिनींमध्ये घरी परतताना किरकोळ कारणांवरून वाद झाल्यानंतर त्यांनी एकमेकींना भररस्त्यात लोळवून लोळवून मारल्याची घडना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कॉलेजमधून घरी परतत असताना विद्यार्थिनींमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर या विद्यार्थिनी एकमेकींना मारहाण करत आहेत. यादरम्यान या विद्यार्थिनी एकमेकींचे केस ओढताना, मारहाण करताना दिसत आहेत. याचदरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या कुणीतरी हा व्हिडीओ काढला. तसेच नंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
दरम्यान, या घटनेबाबत स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या विद्यार्थिनींमध्ये कॉलेजच्या आवाराबाहेर पडल्यानंतर कुठल्या तरी कारणावरून भांडण झालं होतं. दरम्यान, या घटनेबाबत कॉलेज प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित हस्तक्षेप करत प्रकरण शांत केलं. वाद मिटल्यानंतर सर्व विद्यार्थिनी आपापल्या घरी गेल्या.