शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

Gyanvapi Masjid Case: शुक्रवारच्या नमाजासाठी ज्ञानवापीत शेकडो लोकांची गर्दी, पोलिसांनी केले परत जाण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 1:39 PM

Gyanvapi Masjid Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. उन्हाळी सुट्टीनंतर 6 जुलै रोजी सुनावणी होणार.

Gyanvapi Masjid Case: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर वझूखाना सील करण्यात आला असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारच्या नमाजासाठी सरकारने केवळ मोजक्या लोकांना परवानगी दिली होती, पण आज अचानक शेकडोंच्या संख्येने लोक मशिदीच्या दिशेने आले. इतक्या मोठ्या संख्येने लोक आल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी अनेकांना परत जाण्याचे आवाहन केले. 

पोलिसांनी लोकांना परतवले पोलिसांनी मैदागीन चौकातूनच नमाजासाठी आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगितले. तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा परिसरातील मशिदीत नमाज अदा करा, असे पोलिसांनी नमाजींना आवाहन केले. याआधी गुरुवारी मशिदी व्यवस्थापनाने किमान लोकांना आवारात येण्याचे आवाहन केले होते. मात्र शुक्रवारच्या नमाजासाठी अचानक गर्दी वाढली. सध्या मशिदीच्या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वझूखान्यात जाण्यास बंदीतत्पूर्वी, डीएम कौशल राज शर्मा यांनी मशीद समिती आणि मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठक घेतली. यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यासोबतच वझूमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मशिदीमध्ये वूजूच्या पाण्याचे दोन ड्रम ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. डीएमच्या वतीने मस्जिद कमिटीला नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामध्ये कोणीही सीलबंद परिसरात जाण्याचा प्रयत्न करू नये किंवा परिसर सील करण्यासाठी लावलेल्या नऊ कुलूपांमध्ये छेडछाड करू नये, असे म्हटले आहे. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरण पुढे ढकलले

अलाहाबाद उच्च न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर या प्रकरणावर 6 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. 31 वर्षांपूर्वी 1991 मध्ये दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी करता येईल की नाही, याचा निर्णय उच्च न्यायालयाने घ्यायचा आहे. या प्रकरणी शेवटची सुनावणी 16 मे रोजी झाली होती. गेल्या सुनावणीत हिंदू पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. ती पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम पक्ष आपले युक्तिवाद मांडतील. 

 

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदCourtन्यायालयMosqueमशिदMuslimमुस्लीमPoliceपोलिस