शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरप्रदेशमध्ये गुंडाराज, बलात्कार व हत्येचे सत्र सुरुच

By admin | Updated: June 15, 2014 17:11 IST

उत्तरप्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आता गंभीररुप धारण करत असून बदायू येथे पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.

ऑनलाइन टीम
बदायू (उत्तरप्रदेश), दि. १५ - उत्तरप्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आता गंभीररुप धारण करत असून बदायू येथे पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपींमध्ये पोलिस कर्मचा-याचा मुलाचाही समावेश असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
बदायू येथे काही दिवसांपूर्वी दोघा बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांचे मृतदेह झाडावर लटकवले होते. त्यापाठोपाठ भाजपच्या दोघा नेत्यांची हत्या झाल्याने उत्तरप्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. बदायूत  एका विवाहीत महिलेवर तिघा नराधमांनी बलात्कार केला. शुक्रवारी रात्री पिडीत महिला तिच्या दोन लहान मुलांसह औषध आणायला गेली. तिथे महिलेला हिमांशू नामक तरुण भेटला. हिमांशूचे वडिल पोलिस असून सध्या ते बहजोई पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. हिमांशूने महिलेला नवीन भाड्याची खोली मिळवून देण्याचे आमीष दाखवत बांधकाम सुरु असलेल्या घरात नेले. तिथे हिमांशू व त्याच्या सोबत आलेल्या दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. शनिवारी सकाळी तिला या प्रकाराची वाच्यता केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत सोडून दिले. यानंतर पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत हिमांशू व अन्य दोघांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. 
उत्तरप्रदेशमधील भाजप नेत्यांच्या हत्येचे सत्रही सुरु आहे. रविवारी बरेलीत उत्तराखंडमधील भाजप नेते राकेश रस्तोगी यांचा मृतदेह कारमध्ये आढळला. रस्तोगी यांचे हात बांधलेले होते. तसेच त्याच्या मृतदेहावर चाकूने वार केल्याचे आढळले आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपच्या खासदार निरंजन ज्योती यांच्यावरही शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. सुदैवाने ज्योती या हल्ल्यातून बचावल्या. 
राजकीय नेत्यांवरील हल्ले व महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर सपाचे प्रमुख मुलायम सिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव व अन्य मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.